अमेरिकेच्या आयगेट कॉर्पोरेशन या आउटसोर्सिग कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी फणीश मूर्ती यांना त्यांचे महिला कर्मचाऱ्याची लैंगिक छळवणूक केल्याच्या कारणास्तव हकालपट्टी करण्यात आली. फणीश मूर्ती हे भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगातील एक परिचित अधिकारी आहेत. पूर्वीच्याच एका प्रकरणातील महिलेने खंडणी मिळवण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला असून आपण कुणाचाही लैंगिक छळ केलेला नाही, असा दावा मूर्ती यांनी केला आहे.
मूर्ती यांच्या जागी या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर गेरहार्ड वाटझिंगर यांची नेमणूक करण्यात आली आहे.     

काय म्हणतात मूर्ती?
मूर्ती यांनी एका कॉन्फरन्स कॉलमध्ये एका महिलेचे नाव घेतले होते व तिच्याशी काही महिन्यांपासून संबंध असल्याचे सांगितले होते. या प्रकरणी कंपनीला कल्पना दिली होती व त्यामुळे कुठल्याही धोरणाचे उल्लंघन झालेले नाही, असा दावा मूर्ती यांनी केला आहे.
काय म्हणते आयगेट?
आयगेटने मात्र असे म्हटले आहे, की मूर्ती यांनी सदर महिलेशी असलेल्या संबंधांची पूर्वकल्पना कंपनीला दिली नाही. त्यामुळे कंपनीच्या धोरणाचा तसेच त्यांच्या नोकरी कंत्राटातील अटींचाही भंग झाला आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती
२००४ मध्ये सॉफ्टवेअर क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या इन्फोसिस लिमिटेडने लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणात मूर्ती यांना पद सोडावे  लागले होते. तेव्हा न्यायालयाबाहेर समझोता झाला होता. आता आयगेटमधूनही त्यांची हकालपट्टी झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीने आमच्या व्यावसायिक उलाढालीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आयगेटने म्हटले आहे.