मॅगीची जाहिरात केल्यामुळे अभिनेत्री माधुरी दीक्षित अडचणीत सापडली आहे. मॅगीच्या नमुन्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त शिसे (लेड) आणि मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) नावाचे रसायन आढळून आले आहे. याच उत्पादनाची जाहिरात केल्यामुळे माधुरी दीक्षितला हरिद्वार येथील अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) नोटीस बजावण्यात आली आहे. जाहिरातीच्या माध्यमातून केलेले दावे खोटे असल्यामुळे नोटीस बजावण्यात आली.
माधुरी दीक्षितला १५ दिवसांमध्ये नोटिसीला उत्तर द्यावे लागणार आहे. मॅगीची जाहिरात करताना त्यातील पोषक मुल्यांबद्दल माहिती देण्यात आली होती. माधुरी दीक्षित हिने जाहिरातीतून केलेले दावे फसवे असल्याचे मॅगीच्या नुकत्याच करण्यात आलेल्या नमुना चाचणीतून स्पष्ट झाले. त्यामुळे माधुरीला नोटीस बजावण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱयांनी सांगितले.