प्रक्षोभक भाषणे केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय प्रमुख प्रवीण तोगडिया व सरचिटणीस जुगल किशोर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील बिरभूम जिल्ह्य़ात रामपुरहट व खरमडंगा येथील भाषणावरून या तक्रारी आहेत.
खरमडंगा येथे धर्मातराच्या कार्यक्रमावरून मात्र कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. रामपुरहट पोलीस ठाण्यात भीम मुरमू या तृणमूल काँग्रेसच्या समर्थकाने तक्रार केली आहे. तोगडिया व जुगल किशोर यांच्या भाषणांनी बीरभूम जिल्ह्य़ात दोन समुदायांत तणाव होऊ शकतो, असा आरोपही या तक्रारीत आहे. दरम्यान, खरमडंगा येथे बुधवारी १५० आदिवासी ख्रिश्चन कुटुंबांनी पुन्हा हिंदूू धर्मात प्रवेश केला. या कार्यक्रमाला एक हजार नागरिकांची उपस्थिती होती, असा दावा विश्व हिंदू परिषदेचे नेते सचिंद्रनाथ सिन्हा यांनी केला.