लुधियानातील किडवई नगरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या(आरएसएस) कार्यालयावर सोमवारी सकाळी काही अज्ञातांनी गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किडवई नगर येथील संघाच्या शाखेवर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी झाला असून, त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे, तर पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.