पाकिस्तानातील पोलिओ निर्मूलन अभियानाच्या पाच कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली़  कराची शहराच्या विविध भागांत आणि पेशावरमध्ये मंगळवारी झालेल्या या भीषण हत्याकांडात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एका १४ वर्षांच्या मुलीचाही समावेश आह़े  
यातील पहिला हल्ला गुलशन-ए-बुनिर भागात नसीम आणि कानीझ या महिला कर्मचारी पोलिओ बुथची व्यवस्था पाहात असताना झाला़  त्यात महिला जागीच ठार झाल्या़  
त्यानंतर अध्र्या तासातच ओरंगी भागात अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एक महिला आणि एका पुरुष पोलिओ कर्मचाऱ्याला ठार केल़े  
तसेच पेशावरमधील खबर- पखतुंख्वा भागात फर्झाना या चौदा वर्षिय मुलीलाही कट्टरतावाद्यांनी ठार केल़े  सोमवारीही एका पोलिओ निर्मूलन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती़  त्यामुळे दोन दिवसांतील मृतांचा एकूण आकडा सहा झाला आह़े
या घटनांनंतर जागतिक आरोग्य संस्थेने तातडीने पोलिओ निर्मूलन अभियान स्थगित केल्याची घोषणा केली़  तशी माहिती सिंध प्रांतातील शासकीय संस्थांना कळविण्यात आल्याचे आरोग्य संस्थेच्या प्रवक्त्यांना सांगितल़े  पोलिओ निर्मूलन अभियान इस्लामविरोधी असल्याचा कांगावा करीत कट्टरतावादी अतिरेकी संघटनांनी त्याला सुरुवातीपासूनच विरोध केले होता़