तीन वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाची हत्या केल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयातील न्यायाधीश रोहितलाल पांडा यांनी मेहरबान अली, सुलतान अली, बेबुला अली, लियाकत अली आणि इरफान अली यांना शिक्षा सुनावली. त्यांनी ३ एप्रिल २०१२ रोजी बारूआन गावात शेख साजन या व्यावसायिकाची त्याच्या घरासमोर हत्या केली
होती.
न्यायालयाने या पाचही आरोपींना दोषी ठरविताना भादंवि ३०२ नुसार जन्मठेप सुनावली. सुनावणीदरम्यान १७ जणांनी साक्ष नोंदविण्यात आली. शेख साजन घरासमोर मोबाईल फोनवर बोलत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी आठपैकी केवळ पाच जणांना अटक करण्यात आले होते. उर्वरित तीनपैकी एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण अद्याप फरार आहेत.