23 June 2017

News Flash

२०१९ सोडाच , २०९० सालातही काँग्रेस सत्तेत येणार नाही- व्यंकय्या नायडू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांपूर्वी अच्छे दिन आणण्याचे वचन दिले होते.

एएनआय, नवी दिल्ली | Updated: January 11, 2017 6:49 PM

Venkaiah Naidu : केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू. (संग्रहित)

काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच देशात ‘अच्छे दिन’ येतील, असा दावा करणाऱ्या राहुल गांधी यांना भाजपचे केंद्रीय नेते व्यंकय्या नायडू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा २०१९ साली सत्तेत येण्याचा दावा ऐकून मला आश्चर्य वाटले. मात्र, २०१९ तर विसराच २०९० साल उजाडले तरी काँग्रेस सत्तेत येऊ शकणार नाही, असा टोला नायडू यांनी लगावला.

राहुल गांधी यांनी बुधवारी नवी दिल्लीत बोलताना काँग्रेसच भारतात अच्छे दिन आणू शकेल, असा दावा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांपूर्वी अच्छे दिन आणण्याचे वचन दिले होते. परंतु त्यांना हे आश्वासन पूर्ण करता आले नाही, असे राहुल यांनी म्हटले. भारताच्या पंतप्रधानांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर इतका कधीच उपहास झाला नव्हता तो यावेळी होत असल्याची बोचरी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जनवेदना आंदोलनादरम्यान केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय केवळ स्वतःच्या हट्टासाठी घेतला गेला असे राहुल गांधी म्हटले. नोटाबंदीच्या निर्णयाचे एकाही अर्थतज्ज्ञाने समर्थन केले नाही. अर्थतज्ज्ञांनी या निर्णयाचा विरोधच नव्हे तर थट्टा केली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. तसेच पेटीएम म्हणजे ‘पे टू मोदी’ असे सांगत राहुल यांनी मोदींच्या डिजिटल व्यवहारांच्या घोषणेचीही खिल्ली उडविली.

रामनामाचा जप करणे आणि गरिबांचा माल हडपणे हीच सुटाबुटातील सरकारची विचारसरणी आहे. याच विचासरणीवरोधात तुम्हाला लढा द्यायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मिळून देशाचे नुकसान करत आहेत. देशात द्वेष पसरवून आणि निश्चलनीकरणाचा निर्णय घेऊन ते हा हेतू साध्य करू पाहत आहेत, असा आरोपही यावेळी राहुल यांनी केला. हा देश केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत चालवत आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त कुणाच्याही मताला ते किंमत देत नसल्याची टीका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीचे फार काही महत्त्व वाटत नाही. त्यामुळेच ते विरोधी पक्ष असो वा सल्लागार असो त्यांच्या मताला किंमतच देत नाही असे राहुल यांनी म्हटले. काँग्रेसच्या काळात देशातील प्रत्येक स्वायत्त संस्थेचा आदर केला जात होता परंतु नरेंद्र मोदीच्या काळात मात्र या संस्थेला दुय्यम दर्जा दिला जात आहे असे राहुल यांनी म्हटले होते.

First Published on January 11, 2017 6:49 pm

Web Title: forget 2019 cong will not be able to come in power even in 2090 venkaiah naidu
 1. N
  NITIN
  Jan 12, 2017 at 9:09 am
  २००४ निवडणुकीच्या आधी पण भाजप अस्संच माजला होता !! आधी देशभरात किमान १००० अति-भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना आणि बाहुबली सारख्या मंत्रांना फाशी देऊन दाखवा आणि मगच नोटा-बंदी सारखी नौटंकी करा.!! एकटा बांधकाम खात्यातील चिखलीकर जर १५० कोटी संपत्ती जमवू शकतो तर बाकीचे काय धुतल्या तांदळा सारखे स्वच्छ आहेत कि काय??
  Reply
  1. P
   PRAMOD
   Jan 11, 2017 at 2:24 pm
   एवढा अतिविश्वास बारा न्हवे नायडू साहेब
   Reply
   1. P
    Pravin patil
    Jan 11, 2017 at 5:06 pm
    Congress mukta Bharat
    Reply
    1. R
     Ramdas Bhamare
     Jan 11, 2017 at 2:00 pm
     २०९० सालचे भविष्य सांगायचा फायदा असा कि त्याची सत्यता पडताळण्यासाठी आपल्यापैकी कुणीही जिवंत असणार नाही .
     Reply
     1. R
      Ramdas Bhamare
      Jan 12, 2017 at 7:44 am
      नॉस्टरडॅम नावाच्या फ्रेंच जोतिषाने आपण भारतात नायडू म्हणून जन्म घेऊ असे भविष्य वर्तविल्याचे वाचनात नाही .
      Reply
      1. S
       shrikant
       Jan 12, 2017 at 11:00 am
       भाटगिरी हाच या नायडूंचा उद्योग..छान करमणूक
       Reply
       1. S
        sudhara
        Jan 11, 2017 at 2:14 pm
        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांपूर्वी २०१४ ला अच्छे दिन आणण्याचे वचन दिले होते ते २०१९ कि 2090 ला पूर्ण होणार !
        Reply
        1. Y
         yogesh
         Jan 12, 2017 at 1:22 pm
         apratim
         Reply
         1. Y
          yogesh
          Jan 12, 2017 at 1:25 pm
          १२५ करोड लोकसंख्येत फक्त पप्पू आणी च आहेत काय ?
          Reply
          1. U
           Ulhas
           Jan 12, 2017 at 8:14 am
           पेटीएम म्हणजे "पे टू मोदी" हा टोमणा लक्ष्यवेधी वाटला. बाकी रागाचे म्हणणे आणि नायडू साहेबानी त्याला दिलेले स्वाभाविक (obvious) उत्तर ह्यात समजून घेण्यापेक्षा वेगळे काही नाही.
           Reply
           1. विनोद
            Jan 12, 2017 at 8:32 am
            असे काही सल्ले देऊ नका!त्यांना अशाच चुका करू देत आणी लोकांना भोग भोगू देत !यांच्या अहंकाराने काँग्रेसचा मार्ग सुकर होत आहे !
            Reply
            1. विनोद
             Jan 11, 2017 at 4:22 pm
             हे जेेव्हा बाेलतात तेव्हा यांचा चेहरा काेणी निरखून पाहिला आहे काय ?कायम एरंडेल पिऊन आल्या प्रमाणे दिसतात.
             Reply
             1. V
              vinay
              Jan 11, 2017 at 2:44 pm
              मुंगेरीलाल के हसीन सपने
              Reply
              1. Load More Comments