भारत आणि नेपाळचे संबंध सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचे मंगळवारी पहाटे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाशी झुंझ देत होते. त्यावर त्यांनी बरेच उपचारही केले. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कर्करोगावर उपचार घेऊन ते अमेरिकेहून परतले होते. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. भारतात परतल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा श्वसनाचा त्रास निर्माण झाला. कर्करोगाशी झुंझ देताना सोमवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कोईराला यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी नेपाळ काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती नेपाळ काँग्रेसचे सचिव प्रकाश मान सिंग यांनी दिली आहे.
सुशील कोईराला यांनी १८ महिने नेपाळचे नेतृत्त्व केले. ११ फेब्रुवारी २०१४ ते १० ऑक्टोबर २०१५ या काळात ते नेपाळचे पंतप्रधान होते.