एका महिलेने केलेल्या तक्रारीवरून उत्तराखंडचे भाजप नेते हरकसिंह रावत यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दिल्लीच्या सफदरजंग पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हरकसिंह रावत हे माजी मंत्री असून त्यांनी ग्रीन पार्क येथील निवासस्थानी आपल्यावर बलात्कार केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या आमदारांनी बंड केले त्यामध्ये हरकसिंह होते आणि मे २०१६ मध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला.