सणोत्सवाच्या तोंडावर जिल्ह्यात एकीकडे कायदा- सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून प्रशासनाचे प्रयत्न आहेत. अशातच गेवराईत घडलेल्या घटनेने कायदा- सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासह इतर अधिकारी गेवराईत तळ ठोकून आहेत. तपासासाठी चार पथके रवाना केली असून सर्वत्र नाकाबंदी केली आहे. गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, श्वान पथक तपासकार्यात आहे.

 

महाराष्ट्रात अवयवदानाबाबत जागरूकता वाढत असल्याचे दिसून येत असली तरी अवयव मागणी आणि अवयव दान करणाऱ्यांची संख्या यात मोठी तफावत आहे. अवयवदात्यांची संख्या वाढावी यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. अवयवदानाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य सरकार एक योजना सुरू करण्याचा विचार करत आहे. याबाबतचे वृत्त ‘मुंबई मिरर’ने दिले आहे. या योजनेंतर्गत अवयवदात्याच्या कुटुंबियांवर विनामूल्य उपचार केले जाणार आहेत. त्याचबरोबर ज्या रूग्णालयांत अवयवदान करण्यात येईल त्या रुग्णालयांमध्ये अवयवदात्यांच्या कुटुंबियांवर उपचार केले जातील, असे सांगण्यात येते. अशा प्रकारची योजना राबवणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरेल.

 

ही योजना सुरुवातीला सरकारी आणि मुंबई महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये सुरू करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक (डीएमइआर) डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली. ही योजना म्हणजे अवयवदात्याच्या कुटुंबियांप्रती व्यक्त केलेली भावना आहे. यामुळे अवयवदात्यांची संख्याही वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अवयवदात्यांच्या कुटुंबियांची मोफत वैद्यकीय तपासणी, विविध आजारांवर मोफत उपचार केले जातील, असेही शिनगारे यांनी सांगितले. अवयवदात्यांच्या कुटुंबियांना एक आरोग्य योजना पत्रिका (हेल्थ स्कीम कार्ड) देण्यात येणार आहे. ही आरोग्य पत्रिका तयार झाल्यानंतर अवयवदात्याच्या कुटुंबियांना एक पैसाही खर्च न करता उपचार करून घेता येतील.

अवयवदात्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा प्रस्तावही देण्यात आल्याची माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे (झेडटीसीसी) उपाध्यक्ष डॉ. एस. के. माथूर यांनी दिली. सध्या अवयव मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत आहे. जनजागृतीच्या माध्यमातूनच ही तफावत दूर करता येईल. अशा प्रकारच्या योजनांमुळे प्रतीक्षा यादी कमी करता येईल, असा विश्वासही माथूर यांनी व्यक्त केला. झेडटीसीसी ही अवयवदाता, अवयव स्वीकारणारा आणि रूग्णालयातील मध्यस्थ म्हणून काम करेल, असेही त्यांनी सांगितले. मुंबईत सध्या ३२०० रूग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. २५० रूग्णांना यकृत, ४० जण हृदय प्रत्यारोपणाच्या तर १० रूग्ण हे फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असल्याची माहितीही त्यांनी दिली. रूग्णालय संघटनेचे अध्यक्ष डॉ. पी. एम. भुजंग यांनी डीएमइआरकडून अद्याप काही सूचना आली नसल्याचे सांगितले. पण आम्ही यापूर्वीच मानवतेच्या दृष्टीकोनातून अशा सुविधा पुरवण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारची योजना एक ‘आदर्श योजना’ असेल, असेही ते म्हणाले.