फ्रान्समधील श्ॉम्पेन वाइनयार्ड्स या फसफसती वाइन तयार करणाऱ्या भागाला युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला आहे. त्यामुळे ताज महाल व चीनच्या महाभिंतीबरोबरच या ठिकाणाचाही उल्लेख सर्वत्र विशेष वारसा ठिकाण म्हणून केला जाईल. जागतिक वारसा मिळाल्याने हे ठिकाण पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येऊ शकतात.
श्ॉम्पेन वाइनयार्ड्स या फ्रान्समधील भागात तीन महत्त्वाच्या प्रभागांचे एकत्रीकरण केलेले असून तेथे सतराव्या शतकापासून ते १९ व्या शतकातील औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीपर्यंत दुय्यम किण्वन क्रियेच्या मदतीने ही वाइन तयार केली जात होती. त्यात कार्बन डायॉक्साईड तयार होत असल्याने ती फसफसते, त्यामुळे तिला स्पार्कलिंग वाईन म्हणतात. फ्रान्समधील बुरगुंडी येथे उत्तर फ्रेंच श्ॉम्पेन येथे रोलिग हिल्समध्ये विशिष्ट द्राक्षे उत्पादित केली जातात. त्यापासून ही वाइन तयार केली जाते. जेथे ती तयार केली जाते ती एक आठवण आहे व कृषी-औद्योगिक संकुल आहे.
जागतिक वारसा ठिकाणात ११ ठिकाणांचा समावेश करण्यात आला असून श्ॉम्पेन व बुरगुंडी या फ्रान्समधील दोन ठिकाणांचा समावेश केला आहे, तेथे फसफसणारी वाइन तयार होते. हा फ्रान्सच्या उत्कृष्टतेचा विजय झाला आहे, असे युनेस्कोतील फ्रान्सचे राजदूत फिलीप ललिऑट यांनी सांगितले.
इतर ठिकाणांमध्ये सिंगापूरचे बोटॅनिक गार्डन्स, तुर्कीतील दियाकबकीर फोर्टेस, इराणमधील सुसा व मेमंड गुंफा, चीनमधील तुसी, कोरियातील बाकेजे, मंगोलियातील ग्रेट बुरखान व खालदून डोंगर व आजूबाजूची पवित्र स्थळे, डेन्मार्कचे ख्रितियनफेल्ड हे मोराविह्य़न चर्च वसाहत, उत्तर झियालँडमधील द पार फोर्स हंटिंग ठिकाण यांचा समावेस आहे. युनेस्कोने आतापर्यंत वारसा दिलेल्या ठिकाणांचे संरक्षण केले नाही असा आरोप केला जात आहे. पर्यटनामुळे या ठिकाणांची हानी होते असे सांगण्यात आले.