स्वयंपाकाचा गॅस अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने पाच किलो वजनाचा सिलिंडर सवलतीतील बाजारात आणला आहे. सर्व महानगरांमध्ये हा सिलिंडर निवडक पेट्रोल पंप व किराणा दुकानांमध्ये उपलब्ध होईल. नोंदणीकृत ग्राहकांना हा पाच किलो वजनाचा सिलिंडर त्यांच्या एलपीजी वितरकाकडे १५५ रुपयांना उपलब्ध असेल. नोंदणीकृत नसलेल्या ग्राहकांना हा सिलिंडर अल्पशा कागदपत्रांच्या सादरीकरणानंतर निवडक पेट्रोल पंप व किराणा दुकानांवर उपलब्ध होऊ शकणार आहे. त्याची किंमत ३५१ रुपये असेल.
शिवाय त्यासाठी त्यांना आधी बुकिंगही करावे लागणार नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

पाच किलो वजनाचा सिलिंडर .
निवडक पेट्रोल पंप व किराणा दुकानांमध्ये उपलब्ध. नोंदणीकृत ग्राहकांना  एलपीजी वितरकाकडे १५५ रुपयांना. अनोंदणीकृत ग्राहकांना अटी, शर्ती पूर्ततेनंतर ३५१  रुपयांना.