एका अल्पवयीन मुलीला गेल्या दोन वर्षांपासून डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका अभियंता पदविकाधारकाला पोलिसांनी कंधमाळ जिल्ह्य़ातील तिकाबली येथून अटक केली.
सदर अभियंत्याचे नाव गोलका बिहारी दिगल (२७) असे असून त्याचे वडील प्रशांत दिगल (४९) आणि आई सुहासिनी (४५) यांनाही अटक करण्यात आली आहे.
गोलकाच्या पालकांविरुद्ध अल्पवयीन मुलीला डांबून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप गोलकावर ठेवण्यात आला आहे.
सदर पीडित मुलीने पाठविलेले पत्र तिकाबली पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. गोलका हा बेरोजगार असून त्याने गंजम जिल्ह्य़ातून दोन वर्षांपूर्वी या पीडित मुलीला फूस लावून पळविले आणि विवाह करण्याचे आश्वासन दिले. तेव्हापासून तो तिच्यावर बलात्कार करीत होता, असे पोलिसांनी सांगितले.