पराकोटीच्या धार्मिक द्वेषाचा प्रत्यय देणारी एक घटना दिल्लीमधील मेट्रोमध्ये घडली आहे. तरुणांच्या एका गटाने वयोवृद्ध मुस्लीम व्यक्तीला सीट नाकारl त्याच्याशी गैरवर्तन केले आहे. याशिवाय तरुणांनी मुस्लिम व्यक्तीला त्याच्या पेहरावावरुन शिवीगाळदेखील केली. दिल्ली मेट्रोतील वॉयलेट लाईनमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला.

दिल्ली मेट्रोमध्ये एका वयोवृद्ध मुस्लिम व्यक्तीने काही तरुणांकडे बसण्यासाठी सीट देण्याची विनंती केली. मात्र तरुणांच्या गटाने मुस्लिम व्यक्तीची मागणी धुडकावून लावली. ‘सीट हवी असेल, तर पाकिस्तानात जा,’ असे या तरुणांनी मुस्लिम व्यक्तीला सुनावले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Preity Zinta Made 120 Parathas
VIDEO : पंजाब किंग्जचा विजय प्रीती झिंटाला पडला होता महागात, संघासाठी बनवावे लागले होते १२० आलू पराठे
Shahryar Khan
व्यक्तिवेध: शहरयार खान
seemajan kalyan samiti rajasthan
RSS च्या संस्थेकडून पाकिस्तानी हिंदूंना सीएए पात्रता प्रमाणपत्रांचे वाटप; नक्की प्रकार काय?

महिला हक्कांसाठी काम कारणाऱ्या कविता महाजन यांनी हा संपूर्ण प्रकार फेसबुकवर शेअर केला. ‘तरुणांकडून शिवीगाळ केली जात असताना एआयसीसीटीयूचे राष्ट्रीय सचिव संतोष रॉय वयोवृद्ध व्यक्तीच्या मदतीसाठी पुढे सरसावले आणि संबंधित व्यक्तीची मदत केली,’ असे कविता महाजन यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

संतोष रॉय यांनी वयोवृद्ध मुस्लीम व्यक्तीची मदत केली आणि गैरवर्तणूक केलेल्या तरुणांना त्यांची माफी मागण्यास सांगितले. मात्र संबंधित तरुणांनी संतोष रॉय यांची कॉलर धरली आणि त्यांनाही ‘पाकिस्तानात जा,’ असे सांगितले. अखेर खान मार्केट स्थानक आल्यावर एक सुरक्षारक्षक मेट्रोमध्ये आला आणि त्याने तरुणांना आवर घातला. याप्रकरणी पांडरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसानंतर संतोष रॉय यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यावेळी त्यांना वयोवृद्ध मुस्लिम व्यक्तीने तरुणांविरुद्धची तक्रार मागे घेतल्याचे समजले. ‘वयोवृद्ध तरुणाने तक्रार मागे घेत असल्याचे पोलिसांना लिखित स्वरुपात सांगितले. दोन तरुणांचे वय लक्षात घेता त्यांना माफ करत असल्याचे वयोवृद्ध तरुणाने पोलिसांना सांगितले होते,’ असे कृष्णन यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.