गोवा सरकारच्या सांस्कृतिक व कला विभागाने त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात परिधान करावयाच्या पोशाखाबाबतच्या संकेतावलीचा आदेश सौम्य केला असून निम्न औपचारिक व आकर्षक, नेहमीचे कपडे परिधान केले तरी चालतील असा नवा आदेश काढला आहे.
कला व सांस्कृतिक विभागाने असे म्हटले होते की, बाही नसलेले टॉप्स, जीन्स चालणार नाहीत, त्यानंतर विरोधी काँग्रेस पक्षाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
कला व सांस्कृतिक विभागाचे संचालक प्रसाद लोलीनकर यांनी काल असा आदेश जारी केला की, आता आमच्या विभागाचे कर्मचारी निम्न औपचारिक व ‘स्मार्ट कॅज्युअल’ (नैमित्तिक) कपडे कार्यालयीन कार्यक्रमात व कार्यालयात येताना परिधान करू शकतील कारण कार्यालयाची शिस्त पाळण्यासाठी ते आवश्यक आहे. कला व सांस्कृतिक मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी सांगितले की, कुठले कपडे परिधान करावेत याबाबत आदेश काढण्यात आला होता हे खरे आहे. आता नवीन आदेश काढण्यात आला असला तरी त्याचा वेगळा अर्थ लावला जाऊ शकतो अशी चर्चा आहे.