गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या त्या कन्या होत्या. गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या प्रमुख नेत्या म्हणून शशिकला काकोडकर प्रसिद्ध होत्या.
दयानंद बांदोडकर यांच्या निधनानंतर शशिकला काकोडकर यांनी १९७३ मध्ये गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर एप्रिल १९७९ पर्यंत त्या गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावर कार्यरत होत्या. गोव्यामध्ये प्राथमिक शिक्षणामध्ये मराठी शिकवणे बंधनकारक करण्यात शशिकला काकोडकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. ९० च्या दशकमध्ये शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी मराठी भाषेला प्राथमिक शिक्षणात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले होते. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणावर इंग्रजी भाषेचा असलेला पगडा कमी करण्यातही त्यांनीच महत्त्वाची भूमिका निभावली होती. सध्या प्राथमिक शिक्षणात इंग्रजीचे वाढत असलेले महत्त्व याच विषयावरून गोव्यातील राजकीय वातावरण पुढील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापलेले आहे. भारतीय भाषा सुरक्षा मंच या गोव्यातील संघटनेचे अध्यक्षपदा शशिकला काकोडकर यांच्याकडेच होते.

Mahayutis Srirang Barne Show of Power An 80-year-old lady Shiv Sainik also participated in rally
महायुतीच्या श्रीरंग बारणेंचं शक्ती प्रदर्शन; ८० वर्षाच्या कट्टर शिवसैनिक आजीही रॅलीत सहभागी
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!