विमानतळाच्या स्वच्छतागृहात सोन्याची बिस्कीटे लपविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तमिळनाडूनच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वच्छतागृहामध्ये पाहणी करताना पोलीसांना एका कागदात गंडाळून ठेवलेली सोन्याची बिस्कीटे आढळून आली. मलेशिया एअरलाईन्सच्या विमानाचे लँडींग झाल्यानंतरच्या काळात हा प्रकार उघडकीस आल्याने याच विमानातून सोन्याची बिस्कीटे आणली गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जप्त करण्यात आलेली बिस्कीटे एकूण २.५ किलोची असून प्रत्येक बिस्कीट १०० ग्रॅम सोन्याचे आहे. याची एकूण किंमत ७५  लाखांपर्यंत आहे.