गुगल डुडलकडून आज लॅडिस्लाव जोस बिरो यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. लॅडिस्लाव जोस बिरो यांची आज ११७ वी जयंती आहे. ज्यांच्या शोधांमुळे जग बदलले अशा निर्मात्यांच्या तुलनेत लॅडिस्लाव बिरो जगाला फारसे परिचित नाही. मात्र, बिरो यांनी लावलेला बॉलपेनचा शोध मानवी इतिहासात खूपच फायदेशीर ठरला. त्यामुळे गुगलकडून नेहमीप्रमाणे अनोख्या पद्धतीचे डुडल बनवून बिरो यांनी मानवंदना देण्यात आली आहे.
हंगेरीच्या बुडापेस्ट इथे जन्मलेले लॅडिस्लाव बिरो हे ज्यू होते. पत्रकार म्हणून काम करत असताना लॅडिस्लाव यांना वृत्तपत्रे छापण्यासाठी वापरण्यात येणारी शाई लवकर सुकत असून त्यामुळे नंतर कागदावर कोणतेही डाग पडत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे सुरूवातीला बिरो यांनी हीच शाई फाऊंटन पेनमध्ये वापरून पाहिली. मात्र, ही शाई घट्ट असल्यामुळे त्यांचा हा प्रयोग अयशस्वी ठरला. त्यानंतर बिरो यांनी त्यांचे बंधू जॉर्जी यांच्याबरोबर काम करण्यास सुरूवात केली. जॉर्जी यांच्यासोबत काम करत असताना बिरो यांनी पेनामध्ये खोबणीद्वारे नियंत्रित होणाऱ्या बॉलचे तंत्र विकसित केले. हाच जगातील पहिला बॉलपेन ठरला. १९३१ मध्ये बुडापेस्ट येथील आंतरराष्ट्रीय मेळाव्यात त्यांनी हा बॉलपेन पहिल्यांदा जगासमोर आणला. १५ जुलै १९३८ ला त्यांना या शोधाचे पेटंट मिळाले. ब्रिटन, आयर्लंड आणि इटलीत आजही या पेनाला बिरोच म्हणतात.
१९४० मध्ये जर्मनीने हंगेरीवर आक्रमण केले तेव्हा बिरो यांना देश सोडावा लागला. ते अर्जेंटिनात आले आणि पेनाचा कारखाना सुरू केला. दुसऱ्या महायुद्धात बॉल पाइंट पेनाचा वापर झाला होता.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..
What is the controversy over the ban fast in Ramadan on footballers in France
रमजानमध्ये उपवास करता येणार नाही? फ्रान्समध्ये फुटबॉलपटूंवरील मनाईचा वाद काय?
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?