गुगल इंटरनेट क्षेत्रातील मोठय़ा कंपनीच्या विरोधात मॅफथॉन २०१३ या अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत प्राथमिक चौकशी सीबीआयने सुरू केली आहे. संवेदनशील क्षेत्रांचे नकाशे व संरक्षण आस्थापनांचे नकाशे गुगलने कायद्याचे उल्लंघन करून तयार केले आहेत.
 गुगलने ज्या गोष्टी भारताच्या नकाशातही दाखवलेल्या नाहीत त्या संवेदनशील भागांचे नकाशे दिले आहेत. गुगलने भारतीय सर्वेक्षण कार्यालयाकडून असे नकाशे तयार करण्याबाबत परवानगी घेतली नव्हती. फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये त्यांनी नकाशांची स्पर्धा घेतली होती, त्यात त्यांनी नागरिकांना त्यांच्या आजूबाजूला असलेली ठिकाणे नकाशात दाखवण्यास सांगितले होते. त्या स्पर्धेचे नाव मॅपथॉन होते. त्यात भारतातील काही संवेदनशील ठिकाणांचा निर्देश करण्यात आला होता.