सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना कोळशाच्या १७ खाणींचे वाटप करण्यात येणार असून त्यासाठी कोळसा मंत्रालयाकडे ३१६ अर्ज आले आहेत. त्यापैकी २३५ अर्ज वीज कंपन्यांकडून तर ३८ अर्ज खाण कंपन्यांकडून आले आहेत.
कोळसा मंत्रालयाकडे आलेल्या एकूण अर्जापैकी २३५ वीज कंपन्यांकडून आणि ३८ खाण कंपन्यांकडून आले असून उर्वरित अर्ज अपूर्ण होते अथवा मागे घेण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एलटीपीसी, न्येवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन, एमओआयएल आदी कंपन्यांनी कोळसा खाणीसाठी अर्ज केले आहेत. कोळसा मंत्रालयाने गेल्या डिसेंबर महिन्यांत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून खाणींसाठी प्रस्ताव मागविले होते.
पहिल्या वाटपात सरकारने केंद्र आणि राज्य सरकारच्या कंपन्यांना खाणींचे वाटप करण्याचे ठरविले आहे. जिलगा-बारपल्ली, बैसी, बनाई, भालमुंडा, केंटे, केरवा (छत्तीसगड), गोवा, पचवारा दक्षिण, कल्याणपूर, बादलपारा (झारखंड), महाजनवाडी (महाराष्ट्र), कुंदनली-लाबुरी, सरपाल-नुआपारा, तेंतुलोई, चंद्रबिला आणि ब्राह्मणी (ओदिशा) येथील खाणींचे वाटप करण्यात येणार आहे.