अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी सरकार सहकार्य करण्यास तयार असल्याचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.

राम मंदिर उभारण्यासाठी सरकारची सहकार्य करण्याची तयारी आहे, परंतु हा प्रश्न सामंजस्याने सोडविला पाहिजे. सरकार मदत करील, मात्र ज्या संघटना राम मंदिरासाठी लढत आहेत त्यांनी प्रत्यक्ष बांधकाम केले पाहिजे, असेही नाईक म्हणाले. अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेने उपस्थित केला त्यानंतर नाईक यांनी वरील मत व्यक्त केले आहे. भाजपने निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता करावी, असे संघ आणि परिषदेने म्हटले आहे.