केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या कल्याणावर खर्च करण्यासाठी सरकारकडे अधिक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी करपात्र सर्व सेवांवर अर्धा टक्का अधिभार लावण्याची घोषणा अरूण जेटली यांनी केली. कृषी कल्याण अधिभार असे त्याचे नाव ठेवण्यात आले आहे.
येत्या एक जूनपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतीसाठी लागणाऱ्या पंपावरील, कोल्ड स्टोरेजसाठीच्या उपकरणांवरील उत्पादन शुल्कात कपातही करण्यात आली आहे.
या दोन्ही माध्यमातून जमा होणारा पैसा शेती क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणार असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले.