याकूब मेमनला फाशी देण्यात आली तो कायदेशीर खून होता व त्याला भारतात आणण्यासाठी सरकारने जी आश्वासने दिली त्यांचा भंग करण्यात आला आहे, अशी दर्पोक्ती मुंबई बॉम्बस्फोटा्रतील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिमचा उजवा हात छोटा शकील याने केली आहे. आता याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील असे त्याने स्पष्ट केले.
संतापलेल्या शकीलने सांगितले की, भारताने विश्वासघात केला आहे त्यामुळे आता दाऊद व इतर फरारी आरोपी सरकारच्या आश्वासनांमुळे भारतात परतण्याची सूतराम शक्यता नाही. दाऊदभाई जर तेव्हा भारतात परत आला असता तर त्याची हीच गत झाली असती हे आता स्पष्ट झाले. याकूबला फाशी देऊन भारताने काय संदेश दिला, भावाच्या कृत्याबद्दल निरपराध व्यक्तीला शिक्षा दिली. डी कंपनी त्याचा निषेध करते, तो कायदेशीर खून होता त्यामुळे आता त्याचे गंभीर परिणाम भोगायला तयार रहा. शकील म्हणाला की, टायगर हा खरा आरोपी होता व याकूब निरपराध होता, पण याकूबलाच भावाच्या कृत्यांसाठी फासावर लटकावण्यात आले. आता यापुढे सरकारने दाखवलेल्या आमिषांना डी कंपनीतील (दाऊद कंपनी) कुणीही भुलणार नाही. टायगर सामील होता काय, असे विचारले असता छोटा शकील म्हणाला की, आरोपपत्रात त्याचा उल्लेख आहे. ज्याने ऑडिओ व व्हिडीओ पुरावे म्हणून स्वत:बरोबर नेले त्याच्यावरच सरकारने खटला भरला. खऱ्या आरोपीचे वर्तन त्याला मान्य नव्हते व तो कायदा मानणारा होता. त्याला आता काय मिळाले तर फाशी. याकूबचे दाऊदशी कुठलेही संबंध नव्हते. सरकारी तपास संस्थांशी समझोत्यामुळे याकूब भारतात आला, त्याचा व कुटुंबीयांचा व्हिसा दुबईत होता. त्याने कुटुंबाला तेथे बोलावले व नंतर शरणागती पत्करली, कशासाठी. शकील धुमसत होता. फाशीमुळे काय बदल होणार आहे? त्यातून नवीन काही मिळाले का. दुसऱ्या कुणी काही जे केले त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. त्याचा भाऊ वेडपट आहे, त्याची शिक्षा त्याला दिली, त्याच्या आईला दिली. ज्याने गुन्हा केला त्याला आणून फाशी द्या, त्याने सरकारवर विश्वास ठेवला व सरकारने विश्वासघात केला. आता डी कंपनीपैकी कुणीही मारले जाण्यासाठी परत येणार नाही. याकूबची पत्नी लहान मुलासह परत आली. काही महिने तुरूंगात राहिली, याला न्याय म्हणतात का, त्याने तुम्हाला चौकशीत सहकार्य केले, सरकारने मात्र विश्वासघात केला.
शकील म्हणाला की, तुमच्याच अधिकाऱ्यांवर तुम्ही विश्वास ठेवला नाही. पहिली गोष्ट म्हणजे बी.रामन व इतरांनी लेख लिहिले पण कुणीही त्यावर विश्वास ठेवला नाही. पाकिस्तानातून पुरावे आणलय़ाबद्दल याकूबला सोडून देण्याचे ठरले होते, असे माजी रॉ अधिकारी रामन यांनी म्हटले होते. दिल्ली एक अफसर.. सीबीआय का. उसने बोला की इसका रोल नही है. पर तुम लोगो ने उसका बिलिव्ह नही किया..
वकील उज्ज्वल निकम यांच्यावर टीका करताना तो म्हणाला की, उज्ज्वल निकमने बोला, एक मेसेज दे रहे हैं उन लोगों को. यार हमें मेसेज देनेके लिए बेगुनाहों को फासी पे लटका रहे हो. ज्या न्यायपीठाने निकाल दिला त्याच न्यायपीठाने फेरविचार याचिका हाताळणे चुकीचे आहे, ते सर्वोच्च न्यायालयाने केले. जिस जगह सुप्रीम कोर्ट में जाती हैं पेटिशन, उसी को रात के डेढ बजे बैठाते हो. क भी होगा जस्टिस..