काश्मिरी जनतेचे प्रश्न समजावून घेण्यासाठी केंद्राकडून शाश्वत चर्चा प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. यासाठी सरकारचे प्रतिनिधी म्हणून इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी यावेळी दिली. ते सोमवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारचे प्रतिनिधी म्हणून दिनेश्वर शर्मा काश्मिरी जनतेच्या इच्छा-आकांक्षा जाणून घेण्यासाठी शाश्वत संवाद आणि चर्चा सुरू करतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कणखर की आडमुठे?

यावेळी राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणाचा दाखला दिला. मोदी सरकार जम्मू-काश्मिरमधील समस्यांविषयी संवेदनशील आहे. त्यामुळेच मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात, काश्मीरचा प्रश्न गोळीने किंवा दुषणे देऊन सुटणार नाही, तर येथील जनतेला आलिंगन देऊन सुटेल, असे म्हटले होते. पंतप्रधानांचे हे वक्तव्य सरकारचे काश्मीरविषयक धोरण स्पष्ट करणारे आहे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले. तसेच चर्चा प्रक्रियेसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या दिनेश्वर शर्मा यांना अंतर्गत सुरक्षाविषयक प्रश्नांचा चांगलाच अनुभव आहे. ते काश्मीरमधील जीवनमानाचे सर्व पैलू जाणून घेण्याबरोबरच जनतेच्या आशा-आकांक्षा जाणून घेतील, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

गळाच; पण..