कारभारात पारदर्शकता येण्यासाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यामुळे उद्योगजगताने या ऐतिहासिक कर सुधारणेत सहभागी व्हावी, असे आवाहन केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे.

जीएसटीबाबत आयोजित कार्यक्रमात त्यांनी याला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याचे नमूद केले. व्यापाऱ्यांनी जीएसटीबाबत धास्ती बाळगू नये. त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, असे आश्वासन इराणी यांनी दिले. जीएसटीवरून व्यापाऱ्यांचे सुरत येथे आंदोलन झाले त्या पाश्र्वभूमीवर इराणींचे मत महत्त्वाचे आहे. काँग्रेस व्यापाऱ्यांमध्ये विनाकारण या मुद्दय़ावर गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.