बलात्कार प्रकरणात आरोपी असलेले स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांचा तात्पुरत्या जामिनासाठीचा अर्ज गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आसाराम बापू यांच्या वतीने भाच्याच्या अंत्यविधीसाठी त्यांना ३० दिवसांचा जामीन मिळावा, अशी याचिका दाखल करण्यात आली होती.
न्यायमूर्ती परेश उपाध्याय यांनी सांगितले, की भाच्याच्या अंत्यसंस्कारांसाठी तीस दिवसांचा जामीन मंजूर करता येणार नाही. आसाराम बापू यांच्या वतीने काल उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तत्पूर्वी गांधीनगर न्यायालयाने त्यांचा जामीनअर्ज फेटाळला होता.
गांधीनगर न्यायालयाने त्यांचा जामीनअर्ज फेटाळताना म्हटले होते, की त्यांचे पुतणे शंकर पगरानी (वय ६८) यांचे १९ मार्चला निधन झाले असले, तरी अंत्यसंस्कार कुटुंबातील इतर सदस्य करू शकतात.