*रेल्वेमध्ये स्वच्छतेसाठी नवा विभाग
*स्थानके आणि रेल्वेगाडय़ांना कंपन्यांची नावे देऊन निधी उभारणी
*ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर ऑनलाइन आरक्षित करता येणार
*रेल्वेच्या नव्या डब्यांमध्ये ब्रेल लिपीतही सूचना
*शारीरिकदृष्टय़ दुर्बल प्रवाशांना डब्यामध्ये पटकन चढता यावे, यासाठी नव्या डब्यांमध्ये दरवाजांची रुंदी वाढविणार
*रेल्वे कर्मचाऱ्यांना कामगिरीवर आधारित बोनस
*रेल्वेमध्येही सौरऊर्जेचा जास्त वापर
*रेल्वेत नोकरीसाठी ऑनलाइन अर्जभरती
*नव्या रेल्वेगाडय़ांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात नंतर घोषणा
*रेल्वेच्या विकासासाठी ११ कलमी कार्यक्रम
*रेल्वेरूळ वाढविण्याला प्राधान्य
*रेल्वेमध्ये खासगी कंपन्यांची गुंतवणूक
*रेल्वेत बायोटॉयलेट उभारणार
*’अ’ श्रेणीतील सुमारे ४०० स्थानकांवर वाय-फाय सुविधा
*सर्व स्थानकांवर लॉकर उपलब्ध करून देणार
*काही रेल्वेगाडय़ांमध्ये आणि लोकलमधील महिलांसाठी राखीव डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
*मुंबईत एसी लोकल लवकरच सुरू करणार
*स्वच्छ रेल, स्वच्छ भारत हे रेल्वेचे नवे ब्रीदवाक्य
*रेल्वेडब्यांमध्ये शिडीची सोय करणार
*रेल्वेच्या वेळापत्रकाची माहिती देणारे एसएमएस अलर्ट
*प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी १८२ हा क्रमांक असलेली हेल्पलाइन
*१३८ हा क्रमांक असलेली हेल्पलाइन देशपातळीवर सुरू करणार
*खासदार निधीतून रेल्वेसाठी निधी देण्याची मागणी
*पाच मिनिटांत विनाआरक्षण तिकीट मिळणार
*रेल्वे ही राष्ट्रीय संपत्ती आणि प्रवाशांचे धावते घर
*महिला सुरक्षेसाठी निर्भया निधीची तरतूद
*ईशान्य  भारत, जम्मू-काश्मीरमध्ये रेल्वेचे जाळे विस्तारणार
*१०८ रेल्वेंमध्ये ई-केटिरग सुविधा मिळणार
*दिल्ली-कोलकाता, दिल्ली-मुंबई या मार्गावरील रेल्वेगाडय़ांचा वेग वाढविणार
*मुंबई-अहमदाबाद मार्गासाठी हायस्पीड ट्रेनचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात
* नऊ मार्गावर हायस्पीड रेल्वे धावणार
*चार महिनेआधी रेल्वे आरक्षण करता येणार
*मानवरहित रेल्वेक्रॉसिंगवर सूचना देण्यासाठी आयआयटी कानपूरसोबत करार
*रेल्वेतील नावीन्यासाठी ‘कायाकल्प’ कार्यक्रम
*निवडक स्थानकांवर प्रवाशांना पिक-ड्रॉपची सुविधा
*रेल्वेडब्यांमध्ये मोबाइल चाìजगसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देणार
*रेल्वेच्या सद्य:स्थितीवर आधारित श्वेतपत्रिका लोकसभेत सादर करणार
*पर्यावरणासाठी रेल्वेमध्ये गुंतवणूक आवश्यक
*पुढील काळात अधिक रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करणार
*रेल्वेरुळांवरील विद्युतीकरणावर भर
*रेल्वे वेळेवर धावाव्यात या दृष्टीने नियोजन

*महानगरांदरम्यानच्या गाडय़ांचा वेग वाढवणार
देशाच्या महत्त्वाच्या महानगरांमधील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नऊ निवडक रेल्वेमार्गावरील गाडय़ांचा वेग ताशी २०० किलोमीटपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
दिल्ली- कोलकाता आणि दिल्ली-मुंबई यांसारख्या महत्त्वाच्या महानगरांधील प्रवास रात्रभरात पूर्ण होऊ शकेल याकरता ९ मार्गावरील गाडय़ांचा वेग सध्याच्या ताशी ११० व १३० किलोमीटरवरून अनुक्रमे ताशी १६० व २०० किलोमीटपर्यंत वाढवला जाईल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केले.
वेग वाढवण्याच्या कामात रेल्वे मार्गाचा दर्जा वाढवणे, इंजिन आणि डबे यांच्या दर्जात सुधारणा करणे, तसेच रुळांची नोंद ठेवणे, त्यांची देखरेख व दुरुस्ती करणे यांचा समावेश असेल.

*दिशादर्शक दस्तावेज
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात नव्या घोषणा कमी आहेत.  रेल्वे अर्थसंकल्प हे धोरणात्मक निवेदन आहे. रेल्वेची स्थिती काय आहे व भविष्यात काय घडणार आहे हे यातून जनतेला समजते. रेल्वेच्या विकासाबाबत २० राज्यांच्या समन्वयातून काम सुरू आहे. कोळसा मंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहकार्याने आम्ही विशेष वापरासाठी वाहने तयार केली आहेत. केवळ एकावर अवलंबून राहण्यापेक्षा अनेकांच्या सहकार्यातून पुढे जाता येईल. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या मदतीने प्रकल्प राबवण्याचा एक मार्ग असल्याचे प्रभू यांनी सांगितले. ज्या कंपन्या सक्षम आहेत, ज्यांनी यापूर्वी प्रकल्प उभारणीत योगदान दिले आहे त्यांची मदत घेता येईल.