‘मी एकटाच एखादी गोष्ट करण्यास समर्थ आहे असे म्हणणा-यावर कधीच विश्वास ठेवू नका, विश्वास त्या व्यक्तीवर ठेवा जो तुम्हाला म्हणेल हे आपण मिळून करू’ असे म्हणत हिलरी क्लिंटन यांनी डोनाल्ड ट्रम्पवर हल्ला चढवला आहे. फिलाडेल्फिया येथे डेमोक्रेटिक नॅशनल केन्व्हेशनमध्ये त्या बोलत होता. हिलरी यांनी औपचारीकरित्या डेमोक्रेटिक पक्षाची अध्यक्षपादाची उमेदवारी स्वीकारली आहे. डोनाल्ड यांना अमेरिकेन नागरिकांमध्ये फूट पाडायची असा आरोपही त्यांनी आपल्या भाषणात केला. ‘हा हेतू आपण कधीच सफल होऊ देणार नाही. अमेरिकेत कोणत्याही धर्मभेदाला खतपाणी घातले जाणार नाही. मी सर्वधर्मसमभावावर विश्वास ठेवते आणि संपूर्ण अमेरिका ही कोणा एका धर्माविरुद्ध नाही, तर ती दहशतवादाविरोधात आहे त्यामुळे अमेरिकाही दहशतवादाविरुद्ध लढेल असेही सडेतोड उत्तर त्यांनी डोनाल्ड ट्रप्म यांना दिले. काही दिवसांपूर्वी प्रचारसभेत डोनाल्ड यांनी धर्मावरून वक्तव्य केले होते. तसेच मुस्लिम धर्मीयांना आणि मेक्सिकोमधून येणा-या स्थलांतरीतांना अमेरिकत येण्यापासून रोखले पाहिजे असेही ते प्रचारसभेत म्हणाले होते. त्याला हिलरी यांनी आपल्या भाषणातून उत्तर देत जनतेची मने जिंकून घेतली. क्लिंटन यांनी आपल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत पाहिल्यांदाच मोठे भाषण दिले. यावेळी आपल्या भाषणांतून त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी दावेदार असलेले त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी ७० मिनिटांचे भाषण दिले पण त्या ७० मिनिटांत त्यांनी अमेरिकन जनतेच्या एकाही समस्येवर उपाय सांगितला नाही अशीही उपरोधिक टीका देखील त्यांनी केली. यावर्षी आठ नोव्हेंबरला अमेरिकन राष्ट्राध्यपदाची निवडणूक होणार आहे. त्यात हिलरी क्लिंटन यांचे डोनाल्ड ट्रम्प हे प्रतिस्पर्धी असणार आहेत.