अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार बर्नी सँडर्स यांनी न्यू हॅम्पशायर येथे डेमोकॅट्रिक पक्षाच्या प्राथमिक फेरीत हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला, तर रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले ओहिओचे गव्हर्नर जॉन कॅसिच यांच्यावर ५० हजार मतांनी विजय मिळवला. हिलरी क्लिंटन यांना ३८ टक्के, तर सँडर्स यांना ६० टक्के मते मिळाली आहेत.
रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांत टेक्सासचे गव्हर्नर टेड क्रूझ, फ्लोरिडाचे माजी गव्हर्नर जेब बुश, फ्लोरिडाचे सिनेटर मार्को रूबियो तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहेत.