डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी हिलरी क्लिंटन यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी जिंकली आहे. फिलाडेल्फियामध्ये डेमोक्रेटिक पार्टीच्या राष्ट्रीय संमेलनात त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली. हिलरी यांचे डेमोक्रॅटिक पक्षातील कट्टर प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांनी त्यांच्या उमेदवारीला याआधी विरोध दर्शवला होता. परंतु नंतर त्यांचा विरोध मावळला. त्यांची उमेदवारी जाहीर होण्याआधी हिलरी या अमेरिकेच्या प्रभावी राष्ट्रपती ठरतील, डोनाल्ड ट्रम्प हे हिलरींच्या जवळपासही नाही आणि त्यांना पाठिंबा देताना मला अभिमान वाटतो आहे असे सांगत सँडर्स यांनी सांगितले.

वाचा : अमेरिकेची निवडणूक यात्रा!
हिलरी क्लिंटन या अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री होत्या. अमेरिकेतल्या प्रभावी व्यक्तीमत्वांपैकी त्या एक आहेत. जगातील प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. दोन दिवसांपूर्वीच रिपब्लिकन पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात होणा-या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये हिलरी क्लिंटन विरूद्ध डोनाल्ड ट्रम्प अशी चुरस रंगणार आहे.

वाचा : राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प यांच्या नावाची अधिकृत घोषणा

वाचा :  अध्यक्षीय उमेदवाराचा सोहळा