विश्व हिंदू परिषदेसह अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी नवरात्रीत गरब्यापासून मुस्लिम युवकांना दूर ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या हिंदू अस्मिता हितरक्षक समितीने मुस्लिम युवकांना गरब्यापासून दूर ठेवण्यासाठी जवळपास दीडहजार हिंदू युवकांची फौज तयार केली आहे.
हिंदू अस्मिता हितरक्षक समिती या संस्थेची अद्याप अधिकृतरित्या नोंदणी झाली नसली तरी, विश्व हिंदू परिषदेचे या संस्थेला समर्थन असल्याचे ‘विहिंप’ नेते आशिष भट्ट यांनी सांगितले.
‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गरब्याच्या ठिकाणी मुस्लिम युवकांना प्रवेश देऊ नका अशी भूमिका याआधी ‘विहिंप’चे महासचिव प्रविण तोगडिया आणि इंदुर येथील भाजप आमदार उषा ठाकूर यांनी मांडली होती. या पार्श्वभूमीवर आता हिंदू संघटनांकडून कठोर पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.