24 September 2017

News Flash

देशातील हिंदू मोदींना माफ करणार नाहीत; मशिद भेटीवरुन हिंदू महासभेचा हल्लाबोल

जपानच्या पंतप्रधानांसह मोदींनी मशिदीला भेट दिली होती

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 3:23 PM

शिंजो आबे आणि नरेंद्र मोदी

भारत दौऱ्यावर आलेले जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (बुधवारी) गुजरातमधील सय्यद मशिदीला भेट दिली. या भेटीबद्दल अखिल भारतीय हिंदू महासभेने नाराजी व्यक्त केली. मोदींची कृती हिंदू धर्मविरोधी असल्याची टीका हिंदू महासभेकडून करण्यात आली आहे. या कृतीबद्दल भारतातील हिंदू मोदींना कधीही माफ करणार नाहीत, अशा कठोर शब्दांमध्ये महासभेने मोदींच्या मशिद भेटीचा निषेध केला.

मोदींच्या मशिद भेटीच्या कृतीमुळे देशभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असे हिंदू महासभेने म्हटले. ‘शिंजो आबे यांना मशिदीऐवजी सोमनाथ मंदिर, द्वारका, ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवायला हवे होते. भारत एक हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्र हिच भारताची जगभरातली ओळख आहे. भगवान शंकर, राम आणि कृष्ण भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहेत. त्यामुळेच जपानी पंतप्रधानांना घेऊन गुजरातमधील हिंदू देवदेवतांच्या भव्य मंदिरांना भेट द्यायला हवी होती. मात्र मोदींनी असे केले नाही. त्यांची ही कृती हिंदू आणि भारतविरोधी आहे,’ असे हिंदू महासभेचे राष्ट्रीय महासचिव मुन्ना कुमार यांनी म्हटले.

गुजरातमधील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदींनी मशिदीला भेट दिली, असेही मुन्ना कुमार यांनी म्हटले. ‘पंतप्रधानांचे हे पाऊल अल्पसंख्यकांचे लांगुलचालन करणारे आहे. अल्पसंख्यांकांच्या लांगुलचालनामुळेच आज काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. भाजपनेदेखील तेच केल्यास त्यांनादेखील सत्ता गमवावी लागेल,’ असेही ते म्हणाले. जपानचे पंतप्रधान दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. काल त्यांचे गुजरातमध्ये आगमन झाले. यावेळी मोदींनी गळाभेट घेत त्यांचे स्वागत केले. यानंतर मोदींनी त्यांच्यासह रोड शो केला. मोदींनी आबेंसह साबरमती आश्रम आणि सिदी सय्यद मशिदीला भेट दिली.

आबे यांच्या भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. सकाळी शिंजो आबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन’च्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. हा प्रकल्प १.८ लाख कोटींचा असणार आहे. हा प्रकल्प ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी उपस्थित होते.

First Published on September 14, 2017 3:23 pm

Web Title: hindu mahasabha strongly condemned pm narendra modis move to visit sidi saiyyed mosque with shinzo abe
 1. P
  pritam lade
  Sep 15, 2017 at 11:26 am
  हिंदू महासभेने हिंदू नाव जोडून हिंदूंना बदनाम करू नये. बिनकामाची हिंदू महासभा!
  Reply
  1. M
   Mit
   Sep 14, 2017 at 5:26 pm
   हिंदू महासभेला कोणीही विचारात नाही. ते सर्व हिंदूंचे प्रतिनिधित्व करत नाहीत. मोदींचे काहीही चुकलेले नाही.
   Reply
   1. S
    satye
    Sep 14, 2017 at 4:41 pm
    जर कोणी मुसलमान देशाचा पंतप्रधान इथे आला असता तर ठीक होते आणि काँग्रेसशी पंत प्रधान यांनी असे केले असते तरी ठीक होते पण चक्क मोदी आता मस्जिदी दाखवायला जपानच्या पंत प्रधानांना न्हेतात हे गणित अजब आहे .ब्र यामध्ये दोघानांही कोणतीही जाऊन पूजा करायची नव्हती .एखाद्या मंदिरांत अथवा बुद्ध मंदिरांत न्हेले असते तरी ठी होते हो आणि भारत हे हिंदू राष्ट्र पण आहे तेव्हा मोदींनी चुकीची कल्पना करून हिंदूंना फसवू नये एव्हडीच इच्छा नाहीतर मते सोडा लोक उद्या मूर्ख म्हणायला पण कमी नाही करणार .
    Reply
    1. N
     NITIN
     Sep 14, 2017 at 4:29 pm
     आधी ढोंगी-सेक्युलर?नेहरू-आंबेडकरांच्या घटनेला विरोध करा!! मग मोदीजींना? काहीही करून समान नागरी कायदा करा-च. बुद्ध आंबेडकर यांचा हिंदू कायदा उलट करा: पुढील ७० वर्षे मुस्लिमाना १-पत्नी कायदा करा आणि हिंदूंना २-शादी तलाक? मुस्लिमाना चीन कायदा लावा १-कुटुंब-२-मुले! त्यांची चीन सारखी प्रगती होईल! आयसिस अतिरेकी आपोआप कमी होतील! बदल्यात मुस्लिम भगिनींना BC कोट्यात आरक्षण द्या! पुढारी आंबयेडकर जातीला आता आरक्षणाची माती खाण्याची काय गरज? फार तर त्याना OBC त ढकला? मुस्लिमाना हिंदूबरोबर सरकारी शाळेत शिकवा! मदरसे-वेद-पाठशाळा बंद करा? मुलींना सानिया मिर्झाकडून शाळेत टेनिस शिकवा! साऱ्या जगात मुस्लिम तालिबानी आयसिस विरुद्ध ३रे महायुद्ध गेली १५वर्षे सुरु आहे?त्याला भारतात वेळीच रोखा?मंदिर-मशिदीवर जबर कर बसवा. आमचा इनकम-टक्स कमी करा, १०वर्षे आयटीत नोकरी करून, घर नाय?
     Reply
     1. D
      D.A.Deshpande
      Sep 14, 2017 at 4:24 pm
      इंडिया हा १२५ कोटी लोक संख्येचा देश आहे पंतप्रधानाने कुठे भेट घ्यावी हे धर्म ठरवत नाही प्रत्येक भारतीयाला ह्या विचारसरणीतून बाहेर येऊन देश घडवावा लागेल तेच भारतातील भावी पिढीची गरज आहे
      Reply
      1. A
       ajay
       Sep 14, 2017 at 4:15 pm
       हिंदू महासभेला कोणी ठेका दिला आहे !! काहीतरी फालतू गिरी !!
       Reply
       1. Load More Comments