जगातील सर्व समस्यांवरील उपाय फक्त हिंदू धर्माकडेच असल्याचा दावा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. गुजरात विद्यापीठात माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनावेळी अमित शहा उपस्थित होते. जगातील कोणत्याही समस्येवर उपाय हे फक्त हिंदू धर्माकडेच असल्याचे शहा यावेळी म्हणाले. हिंदू म्हणून जन्मल्याने हे वक्तव्य करत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणानंतर दोन वर्षे गुजरातमध्ये अमित शहा यांना प्रवेश बंदी असतानाच्या काळाचा उल्लेख शहा यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, त्या दोन वर्षाच्या कठीण काळात मी भारतातील सर्व ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठांचे दर्शन घेतले. देवाच्या आशीर्वादाने मी त्या कठीण परिस्थितून बाहेर पडू शकलो. हिंदू धर्मात प्रत्येक समस्येवर उपाय असतो, असेही ते पुढे म्हणाले.