17 August 2017

News Flash

झेंडावंदन करा, पण राष्ट्रगीत म्हणू नका; उत्तर प्रदेशातील काझींचा फतवा

फतव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र | Updated: August 13, 2017 5:59 PM

राष्ट्रगीत म्हणण्यास मुस्लिम धर्मगुरुंचा विरोध

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारने राज्यातील सर्व मदरशांना स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकावून राष्ट्रगीत म्हणण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. अनेक मुस्लिम धर्मगुरुंनी या विरोधात वक्तव्ये केली असून आता यामध्ये उत्तर प्रदेशमधील बरेलीच्या काझींची भर पडली आहे. स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकवा जावा, मात्र राष्ट्रगीत म्हणू नका, असा आदेश बरेचीच्या काझींकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

‘स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी तिरंगा फडकावा. मात्र राष्ट्रगीत म्हणू नका,’ असा फतवा बरेलीचे काझी असजद आर. खान यांच्याकडून जारी करण्यात आला आहे. खान यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रजा-ए-जमातचे प्रवक्ते नासिर कुरेशी यांनीदेखील मदरशांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येईल. मात्र राष्ट्रगीत म्हटले जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. यासाठी त्यांनी एक पत्रकदेखील प्रसिद्ध केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

उत्तर प्रदेश मदरसा बोर्ड परिषदेकडून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आदेश जारी करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनादिवशी मदरशांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचे छायाचित्रण करण्यात यावे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य दिनादिवशी सकाळी ८ वाजता मदरशांमध्ये तिरंगा फडकावून राष्ट्रगीत म्हणण्याचे आदेशदेखील मदरसा बोर्ड परिषदेकडून देण्यात आले आहेत.

First Published on August 13, 2017 5:41 pm

Web Title: hoist the tricolor but do not sing the national anthem on independence day qazi told up madarsas
 1. Y
  yug
  Aug 14, 2017 at 11:06 am
  अरे रे हे फारच वाईट आहे .मुस्लिमांना राष्ट्रगीत यामध्ये धर्म आडवा येतो .तर मग देश आणि धर्म काही वेगळा आहे का .देश हा पाला पहिला धर्म आहे .मग तिथे काही केल्या मागे वळून बघणे नाही .मुस्लिम समाज आजही या मौला मौलवींच्या विळख्यात अडकला आहे .आणि मुस्लिम धर्माला एवढे मोठे स्वातंत्र्य देऊन आपण भारतीय म्हणून ओळख पुसतो आहे .देशाबद्दल अमाप प्रेम असणे आणि तो कोणत्याही प्रकारे सगळ्यांनी एका सुरांत व्यक्त करणे यात चुकले काय .धर्म कसा काय आडवा येतो यांना .उद्या पाकिस्तानबरोबवर युद्ध झाले तर हे मुस्लिम समाजाने सीमेवर लढ्याचे नाही का .मग तिथे भारत माता कि जय वंदे मातरम याशिवाय दुसरा कोणता उपाय आहे कि पाकिस्तान मुस्लिम देश आहे म्हणून आपले भारतीय मुस्लिम शैनिक शत्रूविरुद्ध लढणार नाहीत .हा धर्माचा दुटप्पीपणा नाही का
  Reply
 2. P
  pritam lade
  Aug 14, 2017 at 10:29 am
  प्रेषितांनी सान्गितलेल्या धर्माच्या विरोधी वागणारे लोक...
  Reply
 3. S
  Sampada Prabhavale
  Aug 13, 2017 at 9:40 pm
  आपल्या देशाचे “राष्ट्रगीत” 'जन-गण-मन' याचा देशातील प्रत्येक व्यक्तीस अभिमान असायला हवा . २६ जानेवारी ,१५ ऑगष्ट या दोन दिवसा करीता न राहता त्याचे मनं रोजच्या रोज होणे गरजेचे आहे. सध्या फक्त हे शाळे मध्येच म्हणताना दिसून येते.आज कितेक अधिकाऱ्यांना,सुसुक्षित लोकांना शासकीय कर्मचाऱ्यांना आपल्या देशाचे “राष्ट्रगीत” म्हणता येत नाही .हि फार मोठी शोकांतिका आहे. या करिता सर्व शासकीय निम-शासकीय कार्यालये ,कंपन्या सामुदायिक कार्यक्रम ,तो मग लग्न समारंभ असेनाका त्याठिकाणी देखील,आपल्या देशाचे “राष्ट्रगीत” म्हणणे गरजेचे आहे .एकाद्या संस्थेची,संघटनेची,पक्षाची बैठक [ मिटिंग ] असो. सुरुवात किंवा शेवट हा राष्ट्रगीतानेच व्हायला हवा . कार्यालय किंवा कंपनीमध्ये सकाळी १० वाजताच कामकाज सुरु करण्या पूर्वीच “राष्ट्रगीत” व्हायला हव,यामुळे प्रत्येकाला आपल्या देशा बद्दल " देशप्रेम " वाढत जाईल .हे करीत असताना या उपक्रमास कोणत्या हि प्रकारचे गालबोट लागणार नाही याची हि खबरदारी घेणे गरजेचे आहे . “राष्ट्रगीत” म्हणणे जे खरोखरच टाळत असतील आणि हे त्यांच्याकडून नियमित घडत असेल तर आशा लोकांना समाज आपोआप दूर करेल .
  Reply
 4. M
  Mangesh mahure
  Aug 13, 2017 at 7:22 pm
  Rashtra drohacha gunha dakhal karav ya kazivar
  Reply
 5. U
  uday
  Aug 13, 2017 at 7:08 pm
  स्वातंत्र दिन तिरंगा फडकावून साजरा करा पण राष्ट्रगीत म्हणू नका,कारण आपली निष्ठा ही प्रथम धर्माशी असते - राष्ट्राशी नाही. राष्ट्राशी प्रथम निष्ठा ठेवायला आपण काय हिंदू आहोत की आपण इतर देशाचे नागरिक आहोत ? भारतात आपले जितके फाजील लाड झाले तितके इतर कोणत्याही देशात होणार नाहीत हे ध्यानात ठेवा. ( पण आपल्या मुसलमानांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय आपले फाजील लाड करणाऱ्या काँग्रेसचा पराभव झाल्याने. )
  Reply
 6. A
  Arun
  Aug 13, 2017 at 6:28 pm
  बसवा अजून ह्यांना डोक्यावर.
  Reply
 7. Load More Comments