होंडा मोटारसायकल आणि स्कूटरने नवीन अॅक्टिवा-आय स्कूटर लॉन्च केली आहे. ऑटोमॅटिक हेडलॅम्प ऑन फिचर असलेल्या अॅक्टिवाचे इंजिन भारत-फोर (BS-IV) प्रकारातील आहे. नव्या अॅक्टिवा-आय स्कूटरची किंमत ४७,९१३ रुपये इतकी आहे. अॅक्टिवा-आय ड्युअल डोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असणार आहे. ऑटोमॅटिक स्कूटर वर्गातील ‘अॅक्टिवा’चा दबदबा कायम राखण्याचे आव्हान नव्या स्कूटरसमोर असेल.

कमी वजनाचे आणि जास्त क्षमतेचे इंजिन ऍक्टिवा-आय स्कूटरचे वैशिष्ट्य आहे. नव्या अॅक्टिवामधील इंजिनची क्षमता ११० सीसी (होंडा इको टेक्नॉलॉजी) असेल. व्ही मॅटिक गियरबॉक्स अॅक्टिवा आयचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. नव्या स्कूटरचा टॉप स्पीड ८३ किलोमीटर प्रतितास इतका आहे. अॅक्टिवा आयचे वजन १०३ किलो आहे.

अॅक्टिवा आयमध्ये कॉम्बी ब्रेक सिस्टमसह मोबाईल चार्जिंग सॉकेटची सोय उपलब्ध आहे. अॅक्टिवा आयचे टायर्स ट्युबलेस आहेत. स्कूटरच्या सीटखाली असणाऱ्या पेट्रोल टाकीची क्षमता १८ लीटर इतकी आहे. आर्किड पर्पल मेटॅलिक, लश मजेंटा मेटॅलिक, निओ ऑरेंज मेटॅलिक, ब्लॅक आणि इम्पिरियल रेड मेटॅलिक अशा पाच रंगांमध्ये अॅक्टिवा आय उपलब्ध आहे.