जपान मधील बुलेट ट्रेन वेगासाठी प्रसिद्ध आहे. याच वेगवान गाडीमध्ये एक हजार प्रवासी प्रवासकरत असताना एका व्यक्तीने स्वतःवर ज्वलनशील तेल ओतूनघेत जाळून घेतले. या दुर्दैवी घटनेमध्ये आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रसिद्धीमाध्यमांनी सांगितले आहे.

शिंकानेसन बुलेट ट्रेनमध्ये ही घटना मंगळवारी घडली असून ज्याव्यक्तीने आत्महत्या केली आहे त्याचे आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अग्नीशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती गंभीर जखमी असून इतर काही जणांना किरकोळ जखम झाली आहे.

टीबीएस या स्थानिक वृत्तवाहिनीने दाखवलेल्या दृश्यांनुसार टबुले ट्रेनमधून धुराचा लोट बाहेर येत होता.तसेच प्रवासी आपल्या नाकावर हात रुमाल धरून बाहेर येत होते. व एक महिला एका लहान बाळाला छातीशी घट्ट धरून जळणा-या ट्रेनमधून बाहेर पडत होती. जे. आर. टोकाय या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एमर्जन्सी बटण दाबल्यानंतर त्वरीत ट्रेन थांबवण्यात आली व प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले.