इंडोनेशियातील मेदान येथे लष्कराचे विमान नागरी वसाहतीवर कोसळल्याने ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता येथील अधिका-यांनी वर्तवली आहे.

हरक्यूलस सी – १३० हे विमान लष्कराच्या सामग्रीची वाहतूक करत होते. या विमानात अपघाताच्या वेळी १२ सैनिक या विमानातून प्रवास करत होते. तसेच काही सैनिक व सैनिकांचे कुटुंबीय मेदान येथील लष्कराच्या विमानतळावर उतरले व किनारपट्टीच्या भागात कर्तव्यावर असणा-या सैनिकांचे ३१ कुटुंबिय या विमानातून प्रवास करत होते. विमानतळावरून उड्डाण घेतल्यावर अंदाजे दोन मिनिटांनी पाच किलोमिटर अंतर पार केल्यावर या विमानाला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नोव्ही या २६ वर्षीय प्रत्यक्षदर्शी तरुणीने असे सांगितले की, विमानाचा जोरदार आवाज येत होता व ते अतिशय कमी उंचीवरून उडत होते. थोड्याच वेळात ते एका इमारतीवर कोसळताना मी पाहिले.

विमान ज्या इमारतीवर कोसळले त्या ठिकाणाहून अडकलेल्या नागरिकांना काढण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आल्याचे येथील पोलीस अधिका-यांनी सांगितले आहे. तसेच ही इमारत नव्यानेच या ठिकाणी बंधण्यात आली असल्याचेही सांगितले जात आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ :०८ वाजता हे विमान कोसळल्याचे लष्कराच्या अधिका-यांनी सांगितले आहे.