एका नवीन ताऱ्याचा जन्म होताना नासाच्या हबल दुर्बिणीने छायाचित्र टिपले आहे. हा तारा त्याच्या कोशातून बाहेर येताना दिसत आहे. या घटनेचे सौंदर्य त्या छायाचित्रातून दिसत
आहे.
नवीन जन्माला आलेल्या या ताऱ्याचे विश्वात स्वागतच होत आहे. या ताऱ्याचे नाव आयआरएएस १४५६८-६३०४ असे असून तो सोनेरी धूसर भागात लपलेला आहे. हा तारा वायूसारखा पदार्थ बाहेर टाकताना दिसत आहे, त्यामुळे धूळ व वायूचा दुसरा थर जाळून टाकला जाईल व हा तारा आणखी स्पष्ट दिसू लागेल. हा तारा २२८० प्रकाशवर्षे दूर असून तो हबल दुर्बिणीतून दिसत आहे.
अवरक्त किरणांमुळे त्याचे दर्शन शक्य आहे. नासाची हबल दुर्बीण १९९०च्या सुमारास सोडली असून तिला ७.९ फुटांचा आरसा आहे. अतिनील व अवरक्त किरण तसेच नेहमीचा दृश्य प्रकाश पकडण्याची क्षमता त्यात आहे. या प्रतिमा जास्त विवर्तनाच्या असल्या तरी त्यांच्या पाठीमागे फारसा प्रकाश दिसत नाही. या ताऱ्यातून स्वनातीत वेगाने वायू बाहेर पडत आहे. ताऱ्यांचा जन्म धूळ व वायूच्या ढगात होत असतो. सिरसीन्स रेणवीय ढगाचा यात समावेश आहे. तो २२८० प्रकाशवर्षे दूर असून तो १८० प्रकाशवर्षे भागात पसरलेला आहे. त्यात २५०००० इतके सूर्यासारखे तारे आहेत. आयआरएएस १४५६८-६३०४ या अवरक्त किरण खगोलीय उपग्रहातून हा तारा १९८३ मध्ये प्रथम शोधण्यात आला तो अमेरिका, ब्रिटन, नेदरलँड्स यांचा संयुक्त प्रकल्प होता. आताचे छायाचित्र नासा व युरोपियन स्पेस एजन्सीच्या हबल दुर्बिणीने घेतले आहे. त्यातून निळा व सोनेरी नारिंगी रंगाचा प्रकाश टिपता येतो. या प्रतिमेत जो काळसर पट्टा दिसतो आहे तो सिरसीन्स रेणवीय ढग असून, तो फार दाट आहे. त्याच्या पलीकडेही तारे आहेत.