सध्या देशभरात मोदी सरकारच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची चर्चा आहे. मात्र, या प्रकल्पाची किंमत विरोधकांच्या टीकेचा विषय ठरत आहे. बुलेट ट्रेनच्या उभारणीसाठी साधारण एक लाख १० हजार कोटी रूपयांचा निधी लागणार आहे. मात्र, आंध्र प्रदेशात याच्या निम्म्या किंमतीमध्ये वाहतुकीचा नवा पर्याय उभारला जात आहे. आंध्र प्रदेशच्या अमरावती आणि विजयवाडा येथे या प्रकल्पांचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे दोन शहरांमधील अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करता येईल, असा दावा या प्रकल्पांची उभारणी करणाऱ्या हायपरलूप ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष बिबॉप ग्रेस्टा यांनी केला. देशात असे प्रकल्प उभारले गेल्यास भारत पायाभूत विकासाच्या क्षेत्रात मोठी झेप घेईल, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे बुलेट ट्रेनपेक्षा स्वस्त असणाऱ्या या तंत्रज्ञानाकडे अनेकांच्या नजरा वळल्या आहेत.

भारत नुकताच हायस्पीड ट्रेनच्या पर्यायाकडे वळला आहे. मात्र, येत्या काही वर्षांमध्ये हायस्पीड ट्रेन कालबाह्य ठरेल. बुलेट ट्रेनवर करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा परतावा मिळणे शक्य नाही आणि या प्रकल्पाला वारंवार अनुदान देण्याची वेळ येईल. त्यामुळे करदात्यांचा पैसा मोठ्या प्रमाणावर वाया जाण्याची शक्यता आहे. मात्र, हायपरलूपकडून उभारणी करण्यात आलेले वाहतूक प्रकल्प भविष्यात फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशातही हे प्रकल्प व्यवहार्य ठरू शकतात आणि गुंतवणुकीचा उत्तम परतावा देऊ शकतात. या भूतलावर मोजकेच स्रोत उपलब्ध आहेत आणि आपण त्यांचा पूरेपूर वापर केला पाहिजे. एखादा हायस्पीड ट्रेनचा प्रकल्प उभारताना जमीन आणि लोकांच्या विस्थापनाचा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे अशा प्रकल्पांमध्ये अनेक अडथळे येतात आणि त्यांची किंमत वाढत जाते. याउलट हायपरलूप प्रकल्पांमध्ये एखाद्या शेतकऱ्याकडून खूपच थोडी जमीन घेतली जाते. याशिवाय, त्याला वाहतूक प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नातील वाटाही दिला जातो. त्यामुळे जमीन अधिग्रहणात विशेष अडथळे येत नाहीत, असा दावा बिबॉप ग्रेस्टा यांनी केला. तसेच अनेक देशांमध्ये हायस्पीड ट्रेनच्या निम्म्या किंमतीत हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. परंतु, त्यासाठी अनेक घटक अनुकूल असण्याची आवश्यकता असते. त्यामुळे भारतात हायपरलूप प्रकल्पांची व्यवहार्यता तपासली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हा प्रकल्प यशस्वी झाल्यास अवघ्या ८ ते १० वर्षांत गुंतवणुकीचा परतावा मिळायला सुरूवात होते. त्यादृष्टीने आम्ही सध्या विजयवाडा आणि अमरावती येथे दररोज १० लाख प्रवाशांची वाहतूक करु शकणाऱ्या प्रकल्पांची उभारणी करत आहोत. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास गुंतवणुकीवरील परतावा आणखी लवकर परत मिळू शकेल, असे ग्रेस्टा यांनी सांगितले.

Aamir Khan announcement that Pani Foundation will implement group farming experiment in the state pune news
पाणी फाउंडेशन राज्यात गटशेतीचा प्रयोग राबवविणार; आमिर खान यांची घोषणा

Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली

mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला

electric bus
कल्याण परिसरातील प्रवाशांसाठी एकत्रित बस सेवेचा विचार; आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांची माहिती