द चार्टर्ड अकाउंटन्सी ऑफ इंडिया (आयसीएआय) या संस्थेच्या वतीने घेण्यात डिसेंबर २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट (सीपीटी) परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. देशातील १७१ शहरांमध्ये दोन टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. तिला ८०० पैकी ५९९ गुण मिळाले आहेत. ७१.७५ टक्के मिळवून भिवंडीच्या पियुष लोहियाने देशातून दुसरा येण्याचा मान मिळवला आहे. तर अहमदाबादच्या ज्योती महेश्वरी हिने ७०.७५ टक्के गुण मिळवून तिसरे स्थान पटकावले. या परीक्षेचा एकूण निकाल ११.५७ टक्के इतका लागला. देशभरातून ३६,७६८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ४,२५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २,६५५ विद्यार्थी ग्रुप १ तर ४,५४५ विद्यार्थी ग्रुप २ मध्ये उत्तीर्ण झाले. परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी  ICAI, icai.nic.in संकेतस्थळावर क्लिक करा. संकेतस्थळाच्या होमपेजवर गेल्यानंतर तुम्हाला सीए आणि सीपीटी निकाल असे दोन विभाग दिसतील. यापैकी एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक अथवा तुमच्या रोल नंबरसोबत दिलेला पिनक्रमांक विचारण्यात येईल. त्यानंतर सबमिट किंवा एंटर बटण क्लिक केल्यास तुम्हाला निकाल पाहता येईल.

या परीक्षेत एकुण २०० प्रश्न असून यापैकी बरेच प्रश्न दीर्घ स्वरूपाचे असून ते सोडविण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. याशिवाय, प्रश्नपत्रिकेत केस स्टडीवर आधारित प्रश्नांचाही समावेश असतो. कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट (सीपीटी) परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला किमान १७० प्रश्न सोडवणे आवश्यक असते. कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट (सीपीटी) या प्रारंभिक टप्प्यात अकाउंटिंग , मर्कंटाइल लॉज , जनरल इकॉनॉमिक्स आणि क्वान्टिटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड यांची चाचणी घेतली जाते. तर सीएच्या अंतिम परीक्षेत फायनान्शियल रिपोर्टिंग, स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट, अ‍ॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट अकौंटिंग, अ‍ॅडव्हान्स्ड ऑडिटिंग, प्रोफेशनल एथिक्स, इन्र्फमेशन सिस्टीम्स कंट्रोल अ‍ॅण्ड ऑडिट, ई-गव्‍‌र्हनन्स, कॉर्पोरेट अ‍ॅण्ड अलाइड लॉज, इंटरनॅशनल टॅक्सेशन, व्हॅट आदी बाबींचा सखोल अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागतो.