सात वर्षे कारावासाची शिक्षा आणि एक ते १०० कोटींचा दंड

भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखविणाऱ्यास किमान सात वर्षे कारावासाची आणि एक ते १०० कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. काही समाजमाध्यमांवर जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश ही राज्ये अनुक्रमे पाकिस्तान आणि चीनचा भाग असल्याचे दाखविण्यात आल्याचे प्रकार घडल्याच्या पाश्र्वभूमीवर सरकारने हा उपाय प्रस्तावित केला आहे.

Saudi Arabia and india
काश्मीरच्या समस्येवर सौदी अरेबियानं स्पष्ट केली भूमिका, दिली भारताला साथ
west bengal chief minister bidhan chandra roy include berubari in indian territory from east pakistan
कचाथीवू गमावले, पण बेरूबारी कमावले… नेहरूंचा विरोध डावलून बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी कसा मिळवला पूर्व पाकिस्तानकडून भारतीय भूभाग?
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार
what is isis khorasan
विश्लेषण : रशियातील हल्ल्याची जबाबदारी घेणारी ‘इस्लामिक स्टेट खोरासन’ संघटना नेमकी आहे तरी काय?

काश्मीर भौगोलिकदृष्टय़ा चीनमध्ये, तर जम्मू पाकिस्तानमध्ये असल्याचे अलीकडेच ट्विटरवर दाखविण्यात आले होते. त्याचा भारत सरकारने निषेध केला होता. त्यानंतर ही चूक सुधारण्यात आली होती. भूस्थानिक माहिती नियमन विधेयक २०१६ च्या मसुद्यानुसार, भारताची भूस्थानिक माहिती घेण्यापूर्वी, ती प्रकाशित करण्यापूर्वी अथवा वितरित करण्यापूर्वी सरकारची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.

कोणतीही व्यक्ती भारताबद्दलची चुकीची माहिती प्रकाशित करू शकत नाही, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमांचाही समावेश करण्यात आला आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यास शिक्षा ठोठावण्यात येईल, असे विधेयकाच्या मसुद्यात म्हटले आहे.