जम्मूमध्ये पक्षाचा विस्तार करण्यासाठी कंबर कसलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना रविवारी सुखद धक्का बसला. पक्ष विस्ताराच्या बैठकीसाठी त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. येत्या ६ महिन्यापर्यंत भाजपची विचारधारा आणि पक्षाचे संस्थापक दीनदयाल उपाध्याय यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे उद्धिष्ट आहे. विशेष म्हणजे जे लोक या बैठकीत सहभागी झाले होते. त्यात ३० काश्मीरी मुस्लिम होते. मुस्लिम समुदायाचे पक्षाबद्दलचे मत बदलत असल्याचे हे द्योतक असल्याचे भाजप नेते आता सांगत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीवेळी तिहेरी तलाकवरून मुस्लिम महिलांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचा दावा भाजपने केला होता.
वर्ष २०१५ मध्ये भाजप आणि पीडीपी युतीचे सरकार बनल्यानंतर अमित शहा यांचा हा पहिलाच जम्मू काश्मीर दौरा आहे. या बैठकीदरम्यान शहा यांनी मंत्र्यांना राज्याचा दौरा करून सामान्य नागरिकांशी संवाद साधा, असा सल्ला दिला होता. उल्लेखनीय म्हणजे राज्याचे राज्यपाल एन.एन.व्होरा हे लोकसभा पोटनिवडणुकी दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतरच्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. व्होरा मंगळवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची मंगळवारी भेट घेण्याची शक्यता आहे.
मंत्र्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रापुरते मर्यादित न राहता काश्मीरमधील अंतर्गत परिसरात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असा सल्ला शहा यांनी दिल्याचे जम्मूमधील नौशेराचे भाजप आमदार रविंदर रैना यांनी सांगितले. पक्षाच्या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकार जम्मूमध्ये शांततेसाठी प्रयत्न करत असल्याचे शहा यांनी सांगितले हेाते. अशा परिस्थितीशी निपटण्याची आपल्याकडे क्षमता असून लवकरच यावर तोडगा निघेल, असेही ते म्हणाले.

INDIA bloc parties manifestoes key issues against BJP
काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहारला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन; इंडिया आघाडीतील पक्षांच्या जाहीरनाम्यांचे विश्लेषण
Difference Between Congress And BJP Manifestos Sankalp patra Nyay Patra
काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी योजने’ला भाजपाकडून ‘लखपती दीदी’चं प्रत्युत्तर; काय आहेत जाहीरनाम्यात महिलांसाठीच्या योजना
Prakash Ambedkar, North Indians,
“भाजपला मनसेच्या पाठिंब्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना”, प्रकाश आंबेडकरांचे विधान; म्हणाले, “भाजपने…”
AIMIM chief Asaduddin Owaisi criticised India Bloc Loksabha Election 2024
मुस्लीम गुलाम व्हावेत ही धर्मनिरपेक्ष पक्षांची इच्छा – ओवैसी