सर्वसमावेशक विकासाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या जगातील ७९ विकसित राष्ट्रांच्या यादीत भारताला ६० वे स्थान मिळाले आहे. जागतिक आर्थिक मंचाद्वारे (डब्ल्यूईएफ) सोमवारी ‘समावेशक वाढ आणि विकास अहवाल २०१७’ प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार , समावेशक विकास निर्देशंकात भारताला शेजारच्या पाकिस्तान आणि चीन यांच्यापेक्षाही खालचे म्हणजे ६० वे स्थान मिळाले आहे. या अहवालात म्हटल्याप्रमाणे बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये आर्थिक विकासाच्या संधी आणि विषमता कमी करण्याच्या संधींना मुकावे लागत आहे. यासाठी धोरणकर्त्यांकडून तयार करण्यात येणारे विकासाचे प्रारूप आणि विकास मोजण्याच्या निकषांमधील त्रुटी कारणीभूत आहेत. त्यामुळे या सगळ्यांमध्ये आमुलाग्र बदल होण्याची गरज असल्याचे ‘डब्ल्यूएफ’च्या अहवालात म्हटले आहे.

१२ निर्देशक घटकांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये देशाच्या सकल राष्ट्रीय उत्त्पनाशिवाय (जीडीपी) वाढ आणि विकास, समावेशकता आणि शाश्वतपणा या अन्य तीन निकषांचाही विचार करण्यात आला होता. या सर्व निकषांच्याआधारे तयार करण्यात आलेल्या ७९ देशांच्या यादीत लिथुआनिया या देशाने पहिला क्रमांक पटकावला असून अझेरबैजान व हंगेरी या दोन राष्ट्रांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे. मात्र, या यादीत भारत जवळपास तळाला म्हणजे ६० व्या स्थानावर फेकला गेला आहे. विशेष गोष्ट म्हणजे भारताची शेजारी राष्ट्रे भारतापेक्षा वरच्या स्थानावर आहेत. यामध्ये चीन १५ व्या, नेपाळ २७ व्या , बांगलादेश ३६ व्या आणि पाकिस्तान ५२ व्या स्थानावर आहे. याशिवाय, ब्रिक्स राष्ट्रांपैकी एक असणारे रशिया आणि ब्राझील अनुक्रमे १३व्या आणि ३०व्या स्थानावर आहेत. प्रचंड मनुष्यबळ आणि प्रति माणसी जीडीपीच्याबाबतीत जगातील पहिल्या दहा देशांमध्ये असूनही भारताला यादीत ६० वे स्थान मिळाले आहे, ही बाब निश्चितच लक्ष वेधून घेणारी आहे. दरम्यान, विकसित राष्ट्रांसाठी अशाचप्रकारे तयार करण्यात आलेल्या अहवालात नॉर्वेने पहिला क्रमांक मिळवला आहे. तर लक्झेम्बर्ग , स्वित्झर्लंड, आईसलँड आणि डेन्मार्क या राष्ट्रांनी अनुक्रमे पहिल्या पाचांमध्ये स्थान पटकावले आहे.

indian economy marathi news (1)
“भारत ७ टक्के विकासदर गाठेल, पण तो पुरेसा नाही कारण…”, RBI च्या चलनविषयक समितीच्या सदस्यांची ठाम भूमिका!
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?