सन २०१० मध्ये बलात्काराच्या सर्वात अधिक घटना घडणाऱ्या पहिल्या दहा देशांच्या क्रमवारीत भारतात तिसऱ्या क्रमांकावर आह़े  तर २०१२ मध्ये झालेल्या हत्यांमुळे देशाचा जगात दुसरा क्रमांक आहे, अशी माहिती बुधवारी राज्यसभेला देण्यात आली़
केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त राष्ट्राने २०१० मध्ये गुन्ह्यांचा कल तपासण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली आह़े  या वर्षांत अमेरिकेत बलात्काराच्या सर्वाधिक ८५ हजार ५९३ घटना घडल्या आहेत़  त्या खालोखाल ब्राझीलमध्ये ४१ हजार १८० आणि भारतात २२ हजार १७२ बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आह़े
संयुक्त राष्ट्राच्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेत प्रतिलक्ष लोकसंख्येमागे २७.३ बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आह़े  हेच प्रमाण ब्राझील २१.९ आणि भारतात १.८ टक्के आह़े  तर ब्रिटनमध्ये याच काळात हे प्रमाण २८.८ टक्के(१५,८९२) आणि मेक्सिकोमध्ये १३.२ टक्के (१४,९९३) आह़े  तर फ्रान्समध्ये १६.२ टक्के (१०,१०८) आह़े  जर्मनी या काळात ७ हजार ७२४ बलात्काराच्या घटना, स्वीडनमध्ये ५ हजार ९६०, रशियामध्ये ४ हजार ९०७, फिलिपिन्समध्ये ४ हजार ७१८ आणि कोलंबियामध्ये ३ हजार १५७ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत़
संयुक्त राष्ट्राच्याच अहवालानुसार २०१२ या वर्षांत सर्वाधिक हत्या ब्राझीलमध्ये(५० हजार १०८) झाल्या आहेत़  तर त्या खालोखाल प्रमाण भारतात (४३,३३५) आह़े  याच काळात नायजेरियात ३३ हजार ८१७, मेक्सिकोत २६ हजार ३७, काँगोमध्ये १८ हजार ५८६, दक्षिण आफ्रिकेत १६ हजार २५९, कोलंबियामध्ये १४ हजार ६७० आणि पाकिस्तानमध्ये १३ हजार ८४६ हत्यांची नोंद करण्यात आली आह़े