जगभरातील १७९ देशांच्या निर्देशांकानुसार जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या क्रमवारीत भारत १४० व्या स्थानावर आह़े  या मानांकनामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे स्थान २००२ सालच्या निर्देशांकापेक्षाही ९ ने घसरले आह़े
पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढल्यामुळे आणि माहितीच्या मायाजालावर सातत्याने वाढविण्यात येणारी बंधने यामुळे भारताची क्रमवारी घसरल्याचे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक तयार करणाऱ्या ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर’ या संस्थेने म्हटले आह़े  उलटपक्षी, साम्यवादी राजवट असणाऱ्या चीनचे मानांकन मात्र १ ने वधारले आह़े  २००२ च्या निर्देशांकानुसार चीन १७२ व्या क्रमांकावर होता, तर २०१३ च्या निर्देशांकात तो १७३ व्या स्थानावर पोहोचला आह़े  या मानांकनात सर्वोच्च स्थानावर फिनलँड, नेदरलँड आणि नॉर्वे हे तीन देश आहेत; तर तुर्कमेनिस्तान, नॉर्थ कोरिया आणि इर्रिटेया हे तीन देश या यादीत सर्वात तळाला आहेत़