भारतीय सागरी त्सुनामी इशारा आणि मदतकार्य यंत्रणेची चाचणी करण्याच्या उद्देशाने येत्या ९ ते १० सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या हिंदी महासागरावरील त्सुनामी प्रात्यक्षिकांमध्ये भारतासह इतर २३ देश सहभागी होत आहेत.
‘युनेस्को’च्या आंतर सरकारी सागरी आयोगाच्या वतीने ही प्रात्यक्षिके भरवण्यात आली आहेत. या कार्यक्रमात प्रत्येक देशांतील आपत्कालीन मदत दलांची तयारी, प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवण्याबरोबरच सागरी प्रांतात एकमेकांतील समन्वय वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. या प्रात्यक्षिकांमध्ये हैदराबाद येथील राष्ट्रीय सागरी माहिती सेवा ही स्वायत्त संस्था सहभागी होत आहे. यात अन्य दोन संस्थांचा समावेश असेल.