पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना समर्थन देण्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर धोरण अवलंबले आहे. यामुळे पाकवर नजर ठेवण्यासाठी भारत आमची मदत करू शकतो, अशी माहिती अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी संयुक्त राष्ट्रसंघात दिली. अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियामध्ये दहशतवादाविरोधात लढण्यासाठी ट्रम्प यांनी नुकताच घोषित केलेल्या नव्या रणनितीचा उल्लेख हेली यांनी केला. ही महत्वाची रणनिती असून भारताबरोबर अमेरिकेची रणनितीक भागीदारी विकसित करणे हे लक्ष्य असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, अमेरिकेच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानला झटका बसू शकतो. कारण अफगाणिस्तानमधील भारताच्या भुमिकेचा ते सातत्याने विरोध करत आले आहेत.

हेली म्हणाल्या, अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियामध्ये अमेरिकेच्या हितासाठी दहशतवाद्यांच्या आश्रयदात्यांना संपवणे महत्वाचे आहे. हे दहशतवादी आमच्यासाठी धोकादायक आहेत. त्याचबरोबर अणवस्त्रे दहशतवाद्यांपासून दूर ठेवणे, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्ही आमची राष्ट्रीय, ऊर्जा, अर्थव्यवस्था, कूटनितिक या सर्व तत्वांचा वापर करू.

ship
इस्रायलशी संबंधित जहाजावर इराणचा कब्जा; १७ भारतीय कर्मचारी संकटात
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Indian Navy
भारतीय नौदलाची मोठी कारवाई; समुद्री चाच्यांच्या तावडीतून २३ पाकिस्तानी नागरिकांची केली सुटका
US statement despite India objection that the legal process should be fair and transparent
‘कायदेशीर प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक असावी’ ; भारताच्या आक्षेपानंतरही अमेरिकेचे वक्तव्य

अमेरिका-भारत मैत्री परिषदद्वारे आयोजित एका कार्यक्रमात हेली म्हणाल्या की, ट्रम्प यांनी पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना दिल्या जाणाऱ्या समर्थनावरून तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. अफगाणिस्तानमध्ये आर्थिक आणि विकासाच्या क्षेत्रात मदतीसाठी भारताकडे अमेरिका पाहते. अफगाणिस्तानमध्ये भारताच्या मदतीची गरज आहे. ते एक चांगले आणि समजदार शेजारी असल्याचेही त्या म्हणाल्या.