माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांचा आरोप
भारत सरकार पाकिस्तानबाबत कठोर भूमिका घेत असून, पाकिस्तानने दक्षिण आशियात शांततेसाठी दिलेल्या प्रस्तावाला भारत सरकारने प्रतिसाद दिलेला नाही, असा आरोप भारताचे माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी केला. काँग्रेस सत्तेवर असताना पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारू नयेत, यासाठी भाजप काँग्रेस सरकारवर दबाव टाकत होता, असे खुर्शिद यांनी म्हटले आहे.
इस्लामाबादेतील जीना इन्स्टिटय़ूटच्या व्याख्यानमालेत बोलताना खुर्शिद यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे कौतुक करताना भारतातील सत्ताधारी भाजप सरकारला लक्ष्य केले. खुर्शिद म्हणाले, मे २०१३ मध्ये नवाज शरीफ यांनी नरेंद्र मोदी यांच्या सोहळय़ाला उपस्थित राहणे हे दूरदर्शी आणि धाडसाचे होते. मात्र, पाकिस्तानच्या या शांततेच्या प्रयत्नाला भारत सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.
खुर्शिद यांनी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधातील लढय़ाचे कौतुक केले.