20 September 2017

News Flash

भारत युद्धात चीनशी जिंकू शकत नाही- फारूख अब्दुल्ला

भारताने आपली राजनैतिक ताकद वाढवण्यावर भर द्यावा.

एएनआय, नवी दिल्ली | Updated: July 17, 2017 4:19 PM

Farooq Abdullah : छाप्यातून काही निष्पन्न होईल तेव्हाच मी एनआयएला मानेल. जर हे छापे फक्त त्यांना घाबरवण्यासाठी असतील तर हे साफ चुकीचे आहे, असे ठाम मत फारूक अब्दुल्लांनी व्यक्त केले आहे.

चीनच्या ताब्यातील काश्मीर परत मिळवता येणे भारतासाठी शक्य नाही. भारताकडे तेवढी ताकद नाही, असे वादग्रस्त विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले. ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, लडाखमधील काश्मीरचा भाग असलेला अक्साई चीनचा परिसर चीनच्या ताब्यात आहे. आपण त्यावरून केवळ आकांडतांडव करू शकतो, पण आपल्याकडे हा प्रदेश परत मिळवण्याची ताकद नाही. हा प्रश्न केवळ चीनशी मैत्री करूनच सोडवता येणे शक्य आहे, त्यावर युद्ध हा पर्याय नाही, असे फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले.

त्याऐवजी भारताने आपली राजनैतिक ताकद वाढवण्यावर भर द्यावा. या मार्गानेच हा प्रश्न सोडवता येणे शक्य आहे. चीन हा पाकिस्तानचा मित्र आहे, असे आपण म्हणतो. मात्र, आपण कधीतरी चीनशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचे प्रयत्न केले का? असे झाले असते तर चीनने पाकिस्तानशी मैत्री केलीच नसती, असा दावाही अब्दुल्ला यांनी केला.

चीनला सध्या त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सील्क रूटसाठी काराकोरम बायपासची निर्मिती करायची आहे. सील्क रूटमुळे चीन बंदरांशी जोडला जाईल. हा रस्ता चीनव्याप्त काश्मीरमधून जाणार आहे. याशिवाय, दलाई लामा हा भारत आणि चीन यांच्यातील वादाचे आणखी एक कारण आहे. दलाई लामा यांना भारतामध्ये आश्रय मिळू नये, यासाठी चीन प्रयत्नशील आहे. मात्र, एखाद्याला आसरा कसा द्यायचा, हे भारताला व्यवस्थितपणे माहिती आहे. एखाद्या व्यक्तीला अशाप्रकारे देशातून हुसकावता येणार नाही, असे अब्दुल्ला यांनी सांगितले.

भारतातील परकीय गुंतवणुकीवर चीननं शांत राहावं; चिनी माध्यमांचा सरकारला घरचा आहेर

भारत आणि चीनमधील संबंध सध्या प्रचंड ताणलेले आहे. भारत, चीन आणि भूतानच्या सीमेवरील डोक्लाममध्ये चीनकडून रस्त्याची निर्मिती केली जाते आहे. भारतीय सैन्याने चिनी सैन्याच्या रस्ते निर्मितीच्या कामाला विरोध केला आहे. त्यामुळे सिक्किम सीमेवर दोन्ही देशांचे जवान आमनेसामने उभे ठाकले आहेत. भारताने सैन्य मागे घ्यावे, अन्यथा परिणाम वाईट होतील, असे इशारे वारंवार चीनकडून देण्यात आले आहेत. मात्र चीनच्या धमक्यांना किंमत न देता भारतीय सैन्य सिक्किममध्ये पाय रोवून उभे आहे.

डोकलामची डोकेदुखी

First Published on July 17, 2017 4:19 pm

Web Title: india lacks power to challenge china farooq abdullah
 1. D
  Dattatray Sawant
  Jul 19, 2017 at 7:53 am
  बकरा बुद्धी ...... ह्याची अक्कल बकऱ्याचे मटण खाण्यापर्यंतच चालेल ........ अब्दुल तुला कोणीहि सल्ला विचारलेला नाही ..... तुझा सल्ला तुझ्या कडेच ठेव आणि बकरे सांभाळ.
  Reply
  1. M
   Madan Jain
   Jul 19, 2017 at 5:15 am
   चुन बरोबर शेपूट तुझ्या सावत्र नेहरूंनी घातली. त्याच्या जगाच्या नेतेगिरी करण्याच्या खाजेने चीन अप्लाय डोक्या वॉर बसला. तू आता तेल लावत जा. याला मोका लावा.
   Reply
   1. G
    ganesh sukare
    Jul 18, 2017 at 10:53 am
    ह्या ला गोळ्या घाला
    Reply
    1. उर्मिला.अशोक.शहा
     Jul 17, 2017 at 6:02 pm
     वंदे मातरम- भारतीय बहादूर सैनिकांचे मनोधर्य खच्चीकरणाऱ्या देशद्रोह्यांना पाकिस्तानात पाठवावे. जा ग ते र हो
     Reply
     1. U
      uday
      Jul 17, 2017 at 5:55 pm
      भारताचे चीनशी युद्ध झालेच तर अब्दुल्ला,मेहबुबा आणि काश्मिरातील फुटीरतावादी आतून चीनला पाठिंबा देतील आणि मदत करतील.
      Reply
      1. C
       common man
       Jul 17, 2017 at 5:18 pm
       Mathya he Amhala be thaw hai. Pan jordar देणार
       Reply
       1. V
        Viren Narkar
        Jul 17, 2017 at 5:02 pm
        तू काळजी करू नकोस. नरेंद्र मोदी मजबूत आहेत. त्यांनी बरोबर फिल्डिंग लावली आहे.
        Reply
        1. V
         vinayak
         Jul 17, 2017 at 4:59 pm
         ह्या देश्द्रोह्याला खरा म्हणजे भारताबाहेर हाकललं पाहिजे .ते सुद्धा पाकिस्तान ..म्हणजे जे कळेल भीक मागायचे म्हणजे काई
         Reply
         1. Load More Comments