ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यानंतर इटलीच्या फिनमेकॅनिका कंपनीशी झालेले सर्व संरक्षण व्यवहार रद्द झाल्याने आता भारत नौदलाच्या नव्या पाणबुडय़ांसाठी जर्मनीकडून पाणतीर (टॉर्पेडो) विकत घेण्याची शक्यता आहे.
भारत सध्या फ्रान्सच्या मदतीने स्कॉर्पीन प्रकारच्या ६ पाणबुडय़ा बांधत आहे. त्यापैकी पहिली पाणबुडी कलवरी या नावाने सप्टेंबर महिन्यात नौदलात दाखल होणार आहे. या पाणबुडय़ांचे प्रमुख अस्त्र असलेले ब्लॅक शार्क पाणतीर फिनमेकॅनिकाची उपकंपनी असलेल्या व्हाइटहेड अ‍ॅलेनिया सिस्टेमी सबअ‍ॅक्वी या कंपनीकडून घेण्यात येणार होते. पण फिनमेकॅनिकाचीच उपकंपनी ऑगस्टा वेस्टलँडकडून घेण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरच्या करारात घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर फिनमेकॅनिकाच्या सर्वच उपकंपन्यांशी झालेले करार रद्द करण्यात आले. त्यामुळे नौदलाच्या नव्या कलवरी वर्गातील (स्कॉर्पीन) पाणबुडय़ांवर शत्रूच्या पाणबुडय़ांचा नाश करण्यासाठी पाणतीर नाहीत.आता ब्लॅक शार्क पाणतीरांना पर्याय म्हणून जर्मनीच्या अ‍ॅटलास इलेक्ट्रॉनिक कंपनीचे सीहाक आणि फ्रान्सच्या एफ-२१ पाणतीरांचा विचार केला जात आहे. या संदर्भात भारताची फ्रान्सशी चर्चा झाली असून फ्रान्सने हे पाणतीर पुरवण्याची तयारी दाखवली आहे. मात्र ते केवळ फ्रान्सने पुरवलेल्या किंवा फ्रान्सच्या सहकार्याने भारतात बांधलेल्या पाणबुडय़ांवरच वापरण्याची अट घातली आहे. त्यानंतर भारत जर्मनीच्या सरकारशी थेट वाटाघाटी करून सीहाक पाणतीर घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या
a young man broke traffic rules while making reels
VIDEO : रील बनवण्याच्या नादात पठ्ठ्याने तोडले वाहतूक नियम, दिल्ली पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल